फायद्याची फणस शेती

फायद्याची फणस शेती फणस हे नगदी पीक म्हणून फायदेशीर ठरू शकते. दक्षिणेकडील राज्यांतील फणस शेती पाहिल्यास याची साक्ष पटू शकते. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये या फळाला फार वरचे स्थान आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत फणसाचे विविध पदार्थ विकून आणि निर्यात करून चांगली कमाई केली जात आहे. मोठय़ा प्रमाणावर फणस लागवड झाल्यास कोकणात त्यावर मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकेल. हवामान व जमीन : या वृक्षाला थंड हवामान आणि तीव्र उन्हाळा सोसत नाही, पण उष्ण-दमट हवामान आणि मध्यम पाऊस असणाऱ्या भागात त्याची चांगली वाढ होऊ शकते. लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर करता येते. पण खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत वाढ चांगली होते. काळ्या चिकण मातीत फळे उशिरा आणि कमी धरतात. समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये हा वृक्ष वाढू शकतो. पण १२०० मीटर उंचीवरच्या भागातील फळे कमी दर्जाची असतात. फणसाच्या जाती : फणसाच्या फळांचे कापा आणि बरका (रसाळ) हे दोन मुख्य प्रकार पडतात. कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. कापा जातिचे फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो....