शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार..

शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार..

भारतीय शेती पद्धतीची (Indian Agriculture)परंपरा फार पुरातन आहे. प्राचीन काळापासूनच निरनिराळ्या शेती पद्धतींचा अवलंब केला जात आहे. (Weather) हवामान, जमिनीचा प्रकार (Types of soil )इ. गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागांत विभागली गेली आहे. या कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे.


Secondary Tillage भारतात दरवर्षीच पिकातील तण नियंत्रणासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात पेरणी झाल्यानंतर तीन, सहा, किंवा नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी करतात. प्रत्येक शेतीची सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते, यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते
कोळपणीचे फायदे :
• कमीत कमी खर्चात व वेळत तण निंयञण होते.
• जमिनीत हवा खेळती राहते तसेच उत्पादनात देखील वाढ होते
• कोळपणीने जमिनीची सुपिकता वाढते
• सुक्ष्म जीवाणुच्या संख्येत वाढ होते..
• शेतातील मशागतीचा खर्च कमी होतो..
• कोळपणीने कीड, रोग यांच्यापासून बचाव करता येतो.
• शेतातील बुरशीचा फैलाव कमी होते..
• सोयाबिन ,ज्वारी, या पिकास कोळपणी केल्यावर त्यांचा भर भसल्यावर पिकांची वाढ चांगली होते..
• जमिनीतील ओल या कारणांनी कमी होते तसेच जमिनीत साठलेली ओल पिकांद्वारे वापरली जाते. सोबतच पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाते.

कोळप्याचे प्रकार :
• मोगी एकचाकी कोळपे
• अखंड फासेचे कोळपे.
• फटीचे कोळपे
• अकोला कोळपे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?