पोस्ट्स

जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? जमिनीची देखभाल कशी कराल?

इमेज
  जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? जमिनीची देखभाल कशी कराल? जमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते. मातीपरीक्षण आवश्‍यक जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर व अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेवर सुपीकता ठरविली जाते. सूक्ष्म जीवाणू व गांडूळ यांच्या कार्यक्षमतेनुसार जमिनीचे सर्व गुण बदलतात. प्रत्येक कृषी हवामान विभागातील जमिनीचे गुणधर्म वेगळे असतात. जमिनीची चाचणी केल्याशिवाय तिच्या गुणधर्माचे व दोषांचे स्वरूप कळत नाही. गुणधर्म व दोष कळाल्याशिवाय जमीन व पीक नियोजनाचा आराखडा तयार करता येत नाही. आराखडा तयार केला नाही, तर जमिनीची पीक उत्पादनक्षमत...

खतातील बनावटपणा असे ओळखा

इमेज
खतातील बनावटपणा असे ओळखा पेरणी झाल्यानंतर पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी शेतकरी पिकांना युरिया पुरवत असतात. पण राज्यात यंदा युरिया आणि खतांचा तुटवडा झाला होता. अशात बनावट खतांची विक्री होत असते यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसानीसह पिकांचे नुकसान होत असतात. बाजारात अनेक दुकानदार बनावट खतांची विक्री करत असतात. अनेक वेळा डीएपीमध्ये खडे आढळून येत असतात. सर्वात जास्त महाग असलेल्या अमोनिया फास्टेटमध्ये खूप बनावट होत असते. आजच्या लेखात आपण बनावट खते कशा पद्धतीने ओळखाची याचे टिप्स देणार आहोत. या टिप्समुळे शेतकऱ्यांची होणारे नुकसान वाचणार आहे. डीएपी – असली आहे किंवा नकली हे ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून मळावे. मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे असली डीएपी आहे. यात अजून एक सोपी पद्धत आहे, डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन त्यावर टाकावे. जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी असली किंवा खरे आहे. पाण्यात विरघळतो युरिया – युरियाचे दाणे ह...

पिकांना पाणी देण्यासाठी 10 एचपीचा सोलर वॉटर पंप ठरेल एक चांगला पर्याय

इमेज
पिकांना पाणी देण्यासाठी 10 एचपीचा सोलर वॉटर पंप ठरेल एक चांगला पर्याय येणाऱ्या काळामध्ये सोलर वाटर पंपाचा वापर वाढेल. तसेच मार्केटमध्ये सोलर वॉटर पंप तयार करणाऱ्या कंपनी आहे काही दिवसात मोठ्या प्रमाणात उतरतील. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे डिझेलच्या वाढत्या किमती तसेच विजेच्या सततचा लपंडाव या समस्यांमुळे शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून सोलार वॉटर पंप फायद्याचे ठरतील.  सोलार वॉटर पंप वापरासाठी केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलर वॉटर पंपाचा व्यवसाय आणि वापर वाढेल यात शंका नाही. भारताला सौर ऊर्जेच्या बाबतीत उपयुक्त मानले जाते. कारण भारतात उष्णता चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. यामुळे येथील शेतकरीसोलर पॅनल ला कृषी पंप जोडून शेतातील आपली पाण्याची गरज भागवू शकता. या क्षेत्रामध्ये बऱ्याच कंपन्या उतरल्या आहेत त्यामधील बड्या कंपन्यांचे लक्ष आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करणे हे होय. मार्केटमध्ये जास्त कंपन्या प्रतिस्पर्धी म्हणून उतरल्याने येणाऱ्या काळामध्ये सोलर कंपनी...

शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! नफा मिळवून देणाऱ्या झेंडू लागवडीची माहिती

इमेज
शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! नफा मिळवून देणाऱ्या झेंडू लागवडीची माहिती झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेन्दुपासून मिळते. जमीन झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते.या पिकाकरिता सुपीक, पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. ज्या जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगले येते. झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत. जाती अ) आफ्रिकन झेंडू : या प्रकारची...

रासायनिक खत वापरामध्ये 10 टक्के बचतीची मोहीम सन 2021-22*

*रासायनिक खत वापरामध्ये 10 टक्के बचतीची मोहीम सन 2021-22* "एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे तंत्र, हाथ साधत उत्पादनाचा मंत्र" महाराष्ट्र शासनामार्फत यावर्षी रासायनिक खत वापरामध्ये दहा टक्के बचतीची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, या मोहिमेच्या अनुषंगाने रासायनिक खतामध्ये बचत करण्याकरिता खालील उपाययोजनांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात येत आहे. 1. माती परीक्षणानुसार किंवा जमीन सुपीकता निर्देशांकानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या गावाच्या जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर करावा. 🔰 2. रासायनिक खतांबरोबर शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तसेच जीवाणू खतांचा एकात्मिक रित्या वापर करावा. 🔰 3. युरिया या नत्रयुक्त खताचा संतुलित व कार्यक्षमपणे वापर करण्याकरिता या खताचा एकदाच वापर न करता टप्प्याटप्प्याने (split doses) वापर करावा. 🔰 4. नत्रयुक्त खतांची बचत करण्याकरिता अझोटोबॅक्टर, रायझोबियम यासारखी जिवाणू खते तसेच हिरवळीची खते ताग, धेचा इत्यादींचा वापर करावा. ...

तंत्रज्ञान मल्चिंग पेपरचे

इमेज
तंत्रज्ञान मल्चिंग पेपर चे मल्चिंग पेपरचा वापर आता बहुतांश भागातील शेतकरी करू लागले आहेत. मात्र मल्चिंग पेपर चा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी. मल्चिंग पेपर वापरताना पाण्याचे नियोजन कसे करावे ? यासारख्या विविध पैलूंबाबबत जाणून घेणे गरजेचे आहे. मल्चफिल्मची निवड करताना मल्चचा रंग, आकार व जाडी यानुसार प्रकार आहेत व पिकाच्या गरजेनुसार मल्च ची निवड करायची असते. विविध रंगी मल्च चे जे उपायोग सांगिलते जातात त्या नुसार होणारे फायदे प्रत्यक्षात होतीलच असे नाही. तंत्रशुद्ध प्रयोगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निरीक्षण मिळाले त्यामुळे स्थायी अनुमान निघालेले नाही साधारणपणे गरजे नुसार ९० ते १२० से. मी चा पन्हा उपलब्ध असतो. भुईमुगात ७ मायक्रोन जाडीचा पेपर वापरायचा असतो. एका वर्षाच्या आत निघणाऱ्या पिकासाठी २० ते २५ मायक्रोन, मध्यम काळाच्या पिकासाठी ४० ते ५० मायक्रोन व बहुवार्षिक पिकासाठी ५० ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरावा.   मल्चिंग पेपर वापरण्याची पद्धत ज्या ठिकाणी मल्चिंगपेपर वापरावयाचे त्या ठिकाणी पीकवाढीच्या पूर्ण ‘ फ्लोरा ’ किंवा पानांचा घेरा आहे, तिथपर्यंत वापरणे आवश्य...

Pearl farming: दर महिन्याला तीन लाख रुपये हवेत मग करा ‘मोत्याची शेती’..

इमेज
Pearl farming: दर महिन्याला तीन लाख रुपये हवेत मग करा ‘मोत्याची शेती’.. जर तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिक चांगला नफा हवा असेल तर तुम्ही मोतीची शेती (Pearl farming) करू शकता. अश्या प्रकारची शेती (Agriculture) करण्यासाठी 50% सरकारी अनुदान देखील प्राप्त होईल. चला जाणून घेऊया या बद्दल सविस्तर माहिती… अलीकडच्या काळामध्ये शेतीसोबतच विविध प्रयोग केले जाता आहेत, मत्स्यपालन, बदकपालन, असे (Fisheries, duck farming, etc.) विविध व्यवसाय केले जातात. अलीकडच्या काळामध्ये मोत्याची शेती देखील मोठा फायदा मिळवून देणारी आहे, 30 हजार रुपये गुंतवणूक (Investment) केल्यास तीन लाखापर्यंत नफा प्राप्त होतो. मोतीची शेती करण्याकरिता आपणास एक तलाव, (Lake) शेततळे म्हणजेच पाण्याचासाठा असणे आवश्यक आहेत, ऑयस्टर (Oyster) आणि योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. भारतात बहुतांशी राज्यामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते, महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी मोतीची शेती करण्यात येते व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाची (Of training) सुविधा देखील उपलब्ध आहे. असे बनतात मोती … प्रथम ऑयस्टरंना जाळीमध्ये बांधले जाते आणि 10 ते 15 दिव...