संत्रा

संत्रा प्रस्तावना महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे. हवामान संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि ५० ते ५३ टक्के हवेतील आद्रता चांगली मानवून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. जमीन मध्यम काळी १ ते १.५ मीटर खोलीची जमीन, त्याखाली पाण्याचा निचरा होईल असा मातीमिश्रित मुरूम अथवा थोडी चुनखडी किंवा वाळूमिश्रित मातीचा थर असलेली व ज्या जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो. अशी जमिनी लागवडीस उत्तम समजली जाते. भारी काळ्या जमिनी, ज्यात काळी माती १.५ ते ३.५ मीटर खोल असून खाली चोपण मातीचा थर असतो तेथे पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असल्याने झाडाच्या मुळ्या सडून पुढे झाडे वाळतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत संत्र लागवड करू नये. पूर्वमशागत संत्र्याची बाग लावण्याकरिता जमिनीच...