पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाणून घ्या वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके

इमेज
 जाणून घ्या वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके   तणनाशक म्हणजे उपयोग नसणाऱ्या वनस्पती नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन जे की पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जर तण येते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशक वापरले जाते. आज आपण कोणत्या पिकांसाठी कोणते तणनाशक व किती प्रमाणात वापरावे ते पाहणार आहोत. १. टोमॅटो - सामान्यतः टोमॅटो पिकामध्ये तनाची निर्मिती खुप प्रमाणात होते त्यामध्ये तुम्हाला जर तणांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर Targa Super & Sencor हे तणनाशक वापरावे जे की १-१.५ ml + १ gm डोस असावा. याच प्रमाणात तुम्ही कोबी या पिकाला सुद्धा हेच तणनाशक व डोस देऊ शकता २. सोयाबीन - सोयाबीन या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Iris हे तणनाशक वापरा ज्याचा डोस २ ml असावा, सोयाबीन पिकासाठी Iris हे तणनाशक खूप प्रभावी आहे. ३. मका - मका या पिकामध्ये तण रोखण्यासाठी तुम्ही Laudis + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ११५ ml + ५०० gm प्रति एकर असावे किंवा Tynger + Atarzin हे तणनाशक वापरावे ज्याचे प्रमाण ३० ml + ५०० gm प्रति एकर असावा. ४. गहू - गहू या पिकातील तण जाळण्य...

वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!

इमेज
  वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल! भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोझीकोडे (केरळ) येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेने नॅनो तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोबियल इन्कॅप्सुलेशन’ पद्धतीतून बायोकॅप्सूल खते विकसित केली आहेत. नुकतेच या कॅप्सूलेशन तंत्राला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. मातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील उपलब्ध उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या प्रमाणावर ठरत असते. मातीमध्ये दिलेली किंवा उपलब्ध असलेली खते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम सूक्ष्मजीव करतात. त्यामुळे बीजप्रक्रिया व आळवणीद्वारे सूक्ष्मजीवांचा समावेश असलेल्या (जैविक) खतांचा वापर केला जातो. मात्र सध्या जैविक खते व घटक प्रामुख्याने टाल्कम आधारित फॉर्म्यूलेशनमध्ये उपलब्ध आहेत. मात्र साठवण, वाहतूक आणि हाताळणीमध्ये अनेक अडचणी येतात. हे टाळण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोझीकोडे (केरळ) येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेतील माजी संचालक डॉ. एम. आनंदराज, मृदा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. दिनेश आणि डॉ. वाय. के. बिनी या संशोधन गटाने अतिसूक्ष्म (नॅनो) तंत्रज्ञानावर आधारित बायो कॅप्सूल स्वरूपातील खते...

चला खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया

  चला खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया जसं की आपणांस ठाऊक आहे की,आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे व भारताची जवळपास 70% जनसंख्या ही शेती व शेतीनिगडित कामाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित आहे.शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक व्यवसाय आहे.शेती ही एक अशी प्राथमिक गतिविधी आहे ज्यात मनुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नाची गरज भागवली जाते.शेती म्हणजे, अन्न, गवत, कापडाचे तंतू, प्राणी, मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन. पिकांची लागवड प्रामुख्याने हवामान आणि मातीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पिकांची लागवड ही तीन हंगामात विभागली गेली आहे ते तीन हंगाम म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी. आज आपण या लेखात या तीन हंगामाविषयीं व त्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांविषयी जाणुन घेणार आहोत. पिकांचे प्रकार खरीप (पावसाळी)हंगाम: पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. भारतीय उपखंडामध्ये खरीप पिके ही जून-जुलैमध्ये पेरणी केली जातात आणि ऑक्टोबरच्या आसपास काढले जातात. खरीप पिके,पावसा...

जाणून घेऊ फरक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि नॉर्मल ट्रॅक्टर मधील

इमेज
जाणून घेऊ फरक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि नॉर्मल ट्रॅक्टर मधील शेतीच्या मशागतीसाठी आता यंत्रांचा वापर होत आहे. नांगरणी आणि इतर च्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. परंतु दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने आपल्या खिशाला कात्री बसत असते. ट्रॅक्टर म्हणा किंवा इतर वाहने यांच्या इंधनावरती मोठा पैसा खर्च करावा लागतो. परंतु शेतीच्या कामासाठी आपण ट्रॅक्टर नाही वापरला तर आपली कामे पडून राहतील. आता बाजारात असे ट्रॅक्टर येणार आहे जे आपला पैसा आणि वेळ वाचणार आहे. या आधी इलेक्ट्रिक बस, कार विषयी ऐकलं वाचला असेल. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे आपल्या इंधनावर होणारा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत.  काय फरक आहे डिझेल ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये  या दोन्ही ट्रॅक्टर मधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या ऑपरेटिंग किंमत. ई ट्रॅक्टरचा ऑपरेटिंग खर्च एका तासामध्ये सुमारे 25 ते 30 रुपये असेल. तर सामान्य ट्रॅक्टर चालवण्यास तर तासाला सुमारे दीडशे रुपये खर्च येतो. ती ट्रॅक्टर प्रति तासाला शेतकऱ्यांचे सुमारे 120 रुपयांची बचत करेल. जर प्रत्येक तासाला तुमच्या...

शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदवता येईल पीक नुकसानीची माहिती

इमेज
  शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदवता येईल पीक नुकसानीची माहिती पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पण विमा कंपन्यांना त्यांच्या नियमानुसार दिलेल्या मुदतीत नुकसानीची माहिती देता आली नाही, केवळ या एकाच कारणाने विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने (central goverment) दिलासा दिला आहे. यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (prime minister crop insurance scheme) खास अॅप विकसित केले आहे. याला ‘क्रॉप इन्शुरन्स अॅप’ असे नाव दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पीक नुकसानीची माहिती घरबसल्या नोंदविता येणार आहे.राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती ही या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या विमा कंपन्यांना निश्‍चित मुदतीत देता येणार आहे.   खरीप हंगामातील पिकांसाठी गेल्या वर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाच्या नुकसानीची माहिती ही नुक...

शेतकऱ्यांना माहित असावी अशी अत्यंत महत्वाची माहिती.*

इमेज
* शेतकऱ्यांना माहित असावी अशी  अत्यंत महत्वाची माहिती.* १ हेक्टर = १०००० चौ. मी .  १ एकर = ४० गुंठे  १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट  १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा  १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!! नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!! जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!! * ग्रामपंचायत * एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.  आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.         ...
इमेज
 * फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का ?* 💧🌨️🌧️🌨️💧🌨️🌧️🌨️ *◻️ पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने इतर हंगामांपेक्षा जास्त असतो. त्यात झडीचा व संततधार पाऊस रोगांचे नियंत्रण ठेवणे अवघड बनवतो. बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुनर्फवारणी विषयी संभ्रम निर्माण होतो.* *पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते* ▫️▫️▫️▪️▪️▪️▫️▫️▫️ * फवारणीनंतर किती वेळाने पाऊस आला ?* 👇👇👇👇👇👇👇 ♦️फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो.  ♦️रसायन जर आंतरप्रवाही असतील तर ३-४ तासात शोषली जातात, व जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर ५०-६०% परिणाम केलेला असतो. अशावेळी पुनर्फवारणीची करू नये. * कोणत्या रसायनाची फवारणी केली* 👇👇👇👇👇👇👇 ऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी १२-१४ तास लागतात त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ऍसिफेट ची फवारणी टाळावी. डायमेथोऍट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर टाळावा. * पावसाची तीव्रता व वेग* 👇👇👇👇👇👇👇 ♦️फवारणीनंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवार...

नमस्कार शेतकरी मित्रहो

  **नमस्कार शेतकरी मित्रहो.** 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🏻 *पावसामुळे 💧 जमिनी मध्ये ओलावा जास्त झाला की सर्वच पिकांना अन्नद्रव्य 🍂🍁🥀 कमतरता होते, कारण पावसामुळे अन्नद्रव्य वाहून जातात तर कुठे पिकांचे अवशेष, पिके  अन्नद्रव्य घेतात. त्यामुळे बाकी पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही.तसेच जमिनीमध्ये जास्त पाणी झाले की जमिनी मधील 🪱  🧫 गांडूळ तसेच सूक्ष्म जिवाणू यांना ऑक्सिजन 🌱 पुरवठा कमी मिळत असल्याने वर येतात ऑक्सिजन घेतात. आणि अन्नद्रव्य सुद्धा घेतात. शेतकरी मित्र अन्नद्रव्य कमतरता मुळे पिकांना रासायनिक  फवारणी 🥡🥡 करतात,रासायनीक खते टाकतात .मग ऑक्सिजन घेण्यासाठी आलेले गांडूळ आणि सूक्ष्म जिवाणू मरतात.सोबतच आपण शत्रू कीटक सोबत शेतकरी मित्रहो 🐥🦆🦅🦉🐝🪱🦋🐞🐜मित्र कीटक सुद्धा मारतो. मग आपल्याला उत्पन्न घट होते. जर आपण सेंद्रीय शेती पद्धत केली,सेंद्रीय औषध फवारणी केली तर तर सूक्ष्म जिवाणू, गांडूळ वाचतात. सोबतच मित्र कीटक वाचतात .🙏🙏आणि सेंद्रीय औषध फवारणी मुळे , सेंद्रीय खते मुळे आपण सुद्धा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, सूक्ष्म जिवाणू ,गांडूळ वाढवू शकतो.आणि उत्पप्न वाढवू 👍🏻?...

दशपर्णी अर्क जाणून घ्या दशपर्णी अर्कचे फायदे, अशा प्रकारे करा तयार

इमेज
दशपर्णी अर्क जाणून घ्या दशपर्णी अर्कचे फायदे, अशा प्रकारे करा तयार दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होऊ शकतो, रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास ते आरोग्यास खूप हानिकारक आहे.त्यामुळे जर आरोग्यावर होणारे वाईट परिणाम व शेतीचा खर्च कमी करण्यासाठी नक्कीच सर्व शेतकर्यांनी या दशपर्णी अर्काचा वापर कीटकनाशक म्हणून केला पाहिजे. भारत सरकारच्या किटकनाशक बंदी कायद्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी हे जैविक कीटकनाशक स्वता: तयार करावे.  साहित्य 1 लिटर तयार करण्यासाठी खर्च फक्त 6 रुपये आहे व 16 लिटर पंपासाठी फक्त 200 मिली घेणे आहे . एका पंपासाठी खर्च 2 रुपये याची माहिती खालीलप्रमाणे कीटकनाशक बनविन्यासाठी लागणारे साहित्य 200 लिटर टाकी कडूनिंब व निंबोळ्या पाला – 5 किलो रुई पाला – 2 किलो धोतरा पाला – 2 किलो एरंडपाला – 2 किलो बिलायत पाला – 2 किलो गुळवेल पाला – 2 किलो निरगुडी पाला – 2 किलो घाणेरी पाला – 2 किलो कणेरी पाला – 2 किलो करंजी पाला – 2 किलो बाभूळ पाला. – 2 किलो एरंड पाला – 2 किलो बेशरम पाला – 2 किलो सीताफळाचा ...

इको-पेस्ट ट्रॅप' सेंद्रीय शेतीतील चिकट सापळा, खर्च होईल कमी

इमेज
इको-पेस्ट ट्रॅप' सेंद्रीय शेतीतील चिकट सापळा, खर्च होईल कमी शेती करत असताना शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी अनेक प्रयत्न करत असतात. सेंद्रिय शेतीमध्ये पैशांची बचत होत असते. कारण त्यात आपण आपल्या जवळ उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून शेती करत असतो. या शेती मधील एक सोपा आणि कमी खर्चातील पर्याय म्हणजे, इको पेस्ट ट्रॅप हे कीटकनाशक ऐवजी उपयोगी ठरते. तर यामध्ये आपण इको पेस्ट ट्रॅप, चिकट सापळाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व एकात्मिक किड नियोजन करून मानवी शरीराला हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर करून दर्जेदार शेती उत्पादनासाठी इको-पेस्ट ट्रॅप' हा कमी खर्चात अत्यंत प्रभावी कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे. इको-पेस्ट ट्रॅप' हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे, पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात. तसेच मीज माशी,खोड कि...

७/१२ म्हणजे काय? farmer, शेतकरी,

इमेज
७/१२ म्हणजे काय?  संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकीहक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे.या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला. 7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही.. !!! 7/12 उतारा हा प्रत्येक शेतकर्‍याला वाचता आला पाहिजे.!!! त्यावर गांवाचे नांव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पध्दती, कब्जेदाराचे नांव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नांव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-7) लिहिलेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजुला (नमुना-12) मध्ये लिहिलेला असतो. सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी 7/12 पुस्तके नव्याने लिहीली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, ...

छोट्या बाटलीमधील डि-कंपोजर शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या कृती आणि फायदे

इमेज
छोट्या बाटलीमधील डि-कंपोजर शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या कृती आणि फायदे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी वेस्ट डि-कंपोजर बनवलं आहे. उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. गायीच्या शेणातील जिवाणू पासून तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामध्ये पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनीच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. संस्थेद्वारा पुरविलेल्या कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते. या द्रावणापासून पुन्हा लाखो लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध ना...

जमिनीतील ओलावादर्शक उपकरण

इमेज
जमिनीतील ओलावादर्शक उपकरण जमिनीतील ओलावा दर्शविणारे उपकरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेने विकसित केले आहे. शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. शेतीमध्येही ऊस, केळी, कापूस यांसारखी नगदी पिके उपलब्ध पाण्यापैकी मोठा हिस्सा खेचून घेतात. या सर्व पिकांमध्ये पिकांच्या आवश्यकतेपेक्षी कमी किंवा अधिक पाणी दिल्यास उत्पादकतेवर परिणाम होतो. त्याच प्रमाणे कमी ओलावा असताना पिकाला मातीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्येही घेण्यात अडचणी येतात. तसेच अतिपाण्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकताही धोक्यात येते. आपल्या शेतजमिनीमध्ये ओलावा किती आहे, याचीच अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. त्याविषयी सारे अंदाज बांधले जातात. म्हणूनच पिकाला नेमके पाणी किती द्यायचे, कधी द्यायचे याविषयी शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत असतात. मातीतील ओलावा जाणून घेण्यासाठी कोइमतूर येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ऊस पैदास संस्थेमध्ये ओलावा दर्शक पकरण विकसित केले आहे. हे वापरण्यास सोपे असून, किंमतही कमी आहे. २०१६ मध्ये संस्थेचे संचालक डॉ. राम बक्षी यांच्या ह...

पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती.

इमेज
पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती. मित्रांनो नमस्कार, पिक विमा ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे. मित्रांनो पिक विमा भरत असतांना कधी कधी चूक होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पिक विमा काळजीपूर्वक भरावा. पिक विमा अर्ज भरत असतांना अनेक प्रश्न निर्माण होतात. पिक विमा अर्ज संदर्भात जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. खालील बाबी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. पिक विमा अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर भरावा. ऑनलाईन पिक विमा अर्जामध्ये बँकेची माहिती कशी टाकावी शेतकऱ्यांची माहिती कशी टाकावी वारसदारांची माहिती कशी टाकावी विविध पिके कसे एड करावे शेतकऱ्यांना स्वतः हा अर्ज भरण्याची इच्छा असेल तर ते कशा पद्धतीने स्वतः पिक विमा भरू शकतात. कोणकोणते कागदपत्रे अपलोड करावे लागतात. ऑनलाईन पिक विमा अर्ज भरतांना सातबारा कोणत्या शेतकऱ्यांना सातबारा अपलोड करावा लागतो व कोणत्या शेतकऱ्यांना सातबारा उतारा अपलोड करण्याची गरज नाही. पिक विमा अर्जासाठी पेमेंट कसे करावे. वालेटमध्ये पैसे नसतील तर पैसे कसे ॲड करावे. पीक प्रमाणपत्र महणजेच पिक पेरा कसा भरावा. पिक पेरा अपलोड कसा करावा. अर...

आणेल समृद्धी मत्स्यशेती !

इमेज
  आणेल समृद्धी मत्स्यशेती ! मत्स्यशेतीच्या पद्धती एक जातीय मत्स्यसंवर्धन (मोनोकल्चर) 1) या प्रकारामध्ये एका वेळेस एकाच जातीच्या माशांचे अथवा कोळंबीचे संवर्धन केले जाते.2) या पद्धतीमध्ये तलावाचा आकार 0.2 ते 1.0 हेक्‍टर एवढा असतो.3) या प्रकारामध्ये कोळंबी जास्तीत जास्त 50,000 नग प्रति हेक्‍टर किंवा मासे 5,000 ते 10,000 बोटुकली प्रति हेक्‍टर या प्रमाणात संचयन केले जाते. एकत्रित मत्स्यसंवर्धन (कंपोझिट फिश कल्चर) 1) या प्रकारामध्ये दोन किंवा जास्त माशांच्या जातींचे एकत्रित संवर्धन केले जाते. या प्रकारात आपल्याकडील तलावातील उपलब्ध जास्तीत जास्त घटकांचा उपयोग कसा होईल, याचा विचार केला जातो. पूर्वी फक्त भारतीय कार्प माशांचे एकत्रित संवर्धन होत होते; परंतु आता चायनीज कार्पचे बीज उपलब्ध असल्याने त्यांचेही एकत्रित संवर्धन केले जाते. 2) या संवर्धनामध्ये तीनही थरांमधील माशांचे संवर्धन केल्यास तीनही थरांमधील तलावातील उपलब्ध अन्नाचा वापर होतो, शिवाय तलावामध्ये शेवाळ किंवा वनस्पती असतील, तर गवत्या मासा त्यांना खातो. 3) भारतीय कार्प साधारणतः वर्षामध्ये 800 ग्रॅम ते 1,000 ग्रॅम वाढतात, तर चायनीज कार...

आता बनणार गायीच्या शेणापासून रंग, ब्रँड अँबेसिडर राहतील नितीनजी गडकरी

इमेज
 आता बनणार गायीच्या शेणापासून रंग, ब्रँड अँबेसिडर राहतील नितीनजी गडकरी संपूर्ण भारतात गाईच्या शेणापासून तयार झालेला वेदिक पेन्टच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण उद्योजक या क्षेत्रात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच या प्राकृतिक पेन्टच्या प्रसारासाठी आपण सदिच्छादूत म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जयपुर मध्ये शेणा पासून रंग तयार करण्याच्या स्वयंचलित यंत्राच्या उद्घाटन करताना ते बोलत होते.    या वर्षी 12 जानेवारी ला नितीन गडकरी यांनी खादी ग्रामोद्योग आयोग गाणं शेणा पासून बनवलेल्या पेंटचे लॉन्चिंग केले होते. तेव्हा त्यांनी सांगीतले होते की शेनापासून बनवलेला रंग हा विषमुक्त आणि इको फ्रेंडली असा आहे. कशाच्या रंगाला भारतीय प्रमाणीकरण संस्थेकडून प्रमाणित करण्यात आल आहे. या रंगाचे पेटंट हे कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटने मिळवले आहे.या रंगामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम चा वापर केला आहे. या शेणा पासून बनवलेल्या रंगाची विक्री जर वाढली तर शेतकऱ्यांच्या कडे असलेल्या शेणाची खरेदी वाढेल. त्यामुळे श...

सेंद्रिय शेतीसाठी – कम्पोस्ट निर्मिती

इमेज
  सेंद्रिय शेतीसाठी – कम्पोस्ट निर्मिती अलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खतांसह विविध उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच तयार केल्यास अधिक स्वस्त पडतात. आजच्या लेखात बायो डायनॅमिक कंपोस्ट, नॅडेप कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धतींची माहिती घेत आहोत. १.  बायो डायनॅमिक कंपोस्ट  साहित्य  :१) एस – ९ कल्चर २) शेतातील काडीकचरा ३) कापसाच्या काड्या ४) शेतातील तण ५) कडूनिंबाच्या झाडाची पाने ६) निरगुडीची पाने एरंडीची पाने गाजर गवत गिरीपुष्प बेशरम ११) ताजे शेण ८ ते १० दिवसांचे १२) १५०० ते २००० लिटर पाणी. तयार करण्याची पद्धत एक टन कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १५ फूट लांब, ५ फूट रुंद जागा लागते. ती शक्यतो पूर्व-पश्चिम असावी. निवडलेली जागा स्वच्छ करून त्यावर हलका पाण्याचा सडा टाकावा. वरीलप्रमाणे जमा केलेल्या ओल्या व सुक्या काडीकचऱ्यावर पाणी टाकून चांगले भिजवावे. त्यानंतर पहिला १ फुटाचा काडीकचऱ्याचा थर द्यावा. त्यावर पाणी टाकावे. दुसऱ्या ८ ते ३ इंच जाडीच्या थरावर शेणकाला शिंपडावा. १ किलो एस-९ कल्चर १०० लिटर पाण्यात टाकून थोडा वेळ चांगले ढव...