ढेमसे लागवड विषयी

ढेमसे लागवड विषयी लागवड: एका ठिकाणी दोन बिया टोकून 2 फुट अंतर ठेवावे. * लागवडीसाठी जाती * - सागर नरेश, महिको टिंडा,अंकूर टिंडा,कलश चित्रा इत्यादी * खत व्यवस्थापन * - एकरी पिकास 200 किलो निंबोळीपेंड, 2 ट्रेलर शेणखत, 2 किलो पीएसबी, 2किलो ट्रायकोडर्मा, 1.5 (दिड) पोते युरीया,2 पोते सुपर फॉस्फेट, 25 किलो पोटॅश देणे, युरीया खत 2 ते 3 हप्त्यांत मुळापासून थोडे अंतर ठेवून द्यावे. त्याशिवाय झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, एकरी 3 ते 4 किलो प्रत्येकी देणे. तसेच दोन किलो अँझोटोबॅक्टर देणे. * ढेमसे लागवड सविस्तर माहिती-* 👇 ढेमसे या पिकास हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची जमीन लागते. हलक्या जमिनीत हे पीक लवकर तयार होते. या पिकास उष्ण हवामान मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही. रोग व किडींचे प्रमाण वाढते.भरपूर सूर्यप्रकाश या पिकाला चांगला मानवतो. ढेमशाची लागवड पा...