पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे

इमेज
ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे उन्हाळा लागल्याने पाण्याची टंचाई सगळीकडे भासू लागते त्यामुळे त्यामध्ये पाणी याला खूप महत्त्वाचे स्थान आहे उन्हाळा लागल्याने तीव्र उष्णता प्रत्येक प्राण्यांना जाणवणे हे साहजिक च आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुद्धा पाण्याची ची टंचाई भासू लागते. प्रत्येकाला पाण्याची नितांत गरज असते जसे माणसाला पिण्यासाठी, वापरण्यासाठी लागते. तसे च इतर प्राण्यांना सुद्धा पाण्याची नितांत गरज असते ती पिण्यासाठी. त्यामुळे उन्हाळा लागला की आपण पाण्याचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. जेवढे पाणी लागते तेवढ्याच पाण्याचा वापर केला पाहिजे व आपल्या सोबतच अनेक जीवांना सुद्धा पाण्याची गरज पूर्ण होऊ द्यायला पाहिजे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाच्या कालावधीत शेतीत पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. ते कशा प्रकारे करावे शेतकरी बंधूंनो सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जात आहे.या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा. भूपृष्ठावर मोठ...

दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...

इमेज
दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...    आज  ८ मार्च जागतिक महिला दिन तेव्हा या जागतिक महिला दिनाच्या संपूर्ण माता,भगिनी ,बंधू व सर्व देशवासीयांना कृषी महाविद्यालय रिसोड (करडा) व कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम व माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ग्रामीण भारतातील शेतकरी महिला, ग्रामीण युवती एकदा जागृत व प्रज्वलित झाली की तिच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राची प्रगती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भगिनी माता आणि बंधुंनो 2001 च्या जनगणनेप्रमाण  ग्रामीण भागातील महिला साक्षरता दर साधारणता 31.6% आहे. कृषी किंवा शेतीमधील विविध विविध कामाचा विचार केल्यास साधारणपणे शेतीमधील जमीन तयार करण्याच्या कामात महिलांचा सहभाग 32%, पेरणी व शेत स्वच्छता मोहिमे मधील महिलांचा सहभाग 80 % टक्के, आंतरमशागतीच्या कामांमधील सहभाग 86% कापणी, मळणी उपननी, धान्य वाळवणे स्वच्छ करणे तसेच धन्याची साठवणूक करणे इत्यादी कामात 84% इतका महिलांचा सर्वसाधारण सहभाग असतो. याचाच अर्थ असा की शेतीच्या विविध कामातील महिलांचा सहभाग जवळजवळ  50 % ते 75 %  आहे. ...

उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र

इमेज
*_🌱 उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र 🌱_* * *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *_ᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝ_* _कडधान्य पिकातील अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे अतिमहत्वाचे पीक असून, महाराष्ट्रात त्याचे सुमारे ३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे, विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केला जातो. परिणामी, कमी पाण्यात उत्पादन, जमिनीचा पोत टिकून राहणे, नत्राची पूर्तता करणे अशा बाबी साध्य होतात, या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो, पीक तयार झाल्यानंतर शेंगा तोडून घेऊन ते जमिनीत गाडल्यास हिरवळीच्या पिकांप्रमाणे परिणाम मिळू शकतात._ _*🌱 जमीन :* मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते, चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळांवरील रायझोबिअम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. त्यामुळे रोपे पिवळी पडून उत्पादनात घट येते. साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते._ _*🌱 हवामान :* २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान चांगले. मात्र ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानातही हे पीक चांगले येते, खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी ह...