इफकोने लॉन्च केला जगातील पहिला नॅनो युरिया द्रव्य; अर्धा लिटरमध्ये होईल एका बोरीचं काम

इफकोने लॉन्च केला जगातील पहिला नॅनो युरिया द्रव्य; अर्धा लिटरमध्ये होईल एका बोरीचं काम इंडियन फारमर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको) भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. इफकोने नॅनो युरिया द्रव्याची तयार केलं आहे. या अर्धा लिटर नॅनो युरियाच्या बाटलीची किंमत फक्त २४० रुपये निश्चित करण्यात आली आहे. जे युरियाच्या गोणीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. इफकोने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने झालेल्या ५० व्या वार्षिक सामान्य बैठकीत प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत लॉन्च केली आहे. यामुळे शेतकरी युरियाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल, असं डॉ यूएस अवस्थी, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, इफ्को यावेळी म्हणाले. इफ्कोने सांगितले की युरियाचा वापर कमी करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत द्रव्य युरिया लॉन्च करण्यात आले आहे. इफ्कोच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी कलोल येथील नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये स्वदेशी आणि प्रोप्रायरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नॅनो...