पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काबुली हरभरा लागवड

इमेज
काबुली हरभरा लागवड काबुली हरभरा  लागवड सर्वसाधारण हरभऱ्याची लागवड बहुतेक वेळा घरगुती बियाण्याद्वारे जास्त प्रमाणात होते. असे असले तरी शहरी भागात काबुली हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. या हरभऱ्याला भाव सुद्धा जास्त मिळू शकतो. या प्रकारच्या हरभरा लागवडीसाठी अधिक अंतर सोडावे लागते, कारण या झाडाचा आकार मोठा असतो. साधारणपणे २० ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर हा कालावधी हरभरा लागवडीसाठी योग्य मानला जातो. या पिकाला फार खोल नांगरणी न करता, केवळ वखर पाळी मारून ४५ सेमी अंतरावर सरी पाडावी.  वरंब्याच्या माथ्यावर टोकण पद्धतीने ४५ सेमी अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रिया करताना प्रति एक किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम आणि ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे, बियाणे सावलीत सुकवून पुन्हा २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम पीएसबी कल्चर चोळावे. पूर्व मशागत करताना शेणखत आणि पेरणी करताना एकरी ३० किलो युरिया आणि १५० किलो सुपर फॉस्फेट किंवा ५० किलो डीएपी द्यावे. सरी पाडलेली असल्याने मोकळे पाणी देता येते. तुषार सिंचनाची सोय असल्यास आणि परिणाम कारक आणि सोपे जाते. उगवणी नंतर फुलोरा आणि घ...

शेतीत वापरले जाणारे औषध किती प्रमाणात विषारी आहे ते ओळखा

इमेज
शेतीत वापरले जाणारे औषध किती प्रमाणात विषारी आहे ते ओळखा फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे प्रत्येक पेस्टीसाईडच्या पॅकिंगवर अश्या प्रकारचे त्रिकोण दिलेले असतात. ◆ प्रत्येक पेस्टीसाईडच्या पॅकिंगवर ते उत्पादन किती प्रमाणात विषारी आहे हे या त्रिकोणांच्या साहाय्याने दर्शवलेले असते. ◆ सरकारी नियमानुसार असे त्रिकोण प्रत्येक पेस्टीसाईडच्या पॅकिंगवर असलेच पाहिजेत. त्याबाबत खाली अधिक माहिती देत आहोत. १) लाल त्रिकोण :— ● लाल त्रिकोण असलेली पेस्टीसाईडस् ही " अत्यंत विषारी " या गटात मोडतात. या त्रिकोणाच्या वर POISON असे लिहिलेले असते. ● कोणत्याही जनावराच्या किंवा मानवाच्या प्रत्येक किलो वजनामागे याचा घटक फक्त १ ते ५० मिलिग्राम एवढा जरी शरीरात गेला तरी ते प्राणघातक आहे. ● या गटात मिथाईल पॅराथियॉन, मोनोक्रोटोफॉस, फोरेट, झिंक फॉसफाईड, इत्यादी उत्पादने मोडतात. २) पिवळा त्रिकोण :― ● हा त्रिकोण असलेली पेस्टीसाईडस् ही " जास्त विषारी " या गटात मोडतात. ● लाल त्रिकोणाप्रमाणे याही त्रिकोणाच्या वर POISON असे लिहिलेले असते. ● जनावराच्या/मानवाच्या प्रत्येक किलो वजनामागे याचा घटक ५१ ...

हरितगृहाचे फायदे व त्यासाठी जागेची निवड कशी करावी?

इमेज
हरितगृहाचे फायदे व त्यासाठी जागेची निवड कशी करावी? भारतातील तसेच राज्यातील हवामानाचा विचार केल्यास येथील समशीतोष्ण हवामान हरितगृहातील फुलशेतीस तसेच भाजीपाला व इतर फळपिकांच्या उत्पादनास अतिशय उपयुक्त आहे. तसेच या हवामानात हरितगृह उभारण्यासाठी येणारा खर्च देखील युरोपियन देशांमध्ये येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत फार कमी आहे. जर आपण युरोपियन देशांचा विचार केला तर हिवाळ्यात अतिशय कमी तापमानामुळे तेथे पिके चांगली येत नाहीत व जर फुले किंवा भाजीपाला पिके घेण्याचा प्रयत्न केला तर उत्पादन खर्च भरमसाठ येतो परंतु आपल्या देशात नेमके याच्या उलट आहे. आपल्याकडील हवामानात हरितगृहाचे सर्व प्रकारची फळे, फुले व भाजीपाल्याचे उत्पादन उत्कृष्ट येते. या लेखात आपण हरितगृहासाठी जागेची निवड कशी करावी याबद्दल जाणून घेऊ. हरितगृहाचे फायदे कोणते आहेत? 1-फळे,फुले व भाजीपाला यांचे उत्पादन वर्षभर घेता येते. 2- बिगर हंगामी फुलांचे अधिक उत्पादन घेता येते. 3- पारंपरिक पद्धतीपेक्षा चार ते पाच पटीने अधिक उत्पादन घेता येते. 4- हरितगृहामध्ये लांब दांड्याच्या फुलांचे निर्यातक्षम उत्पादन घेता येते. 5- कीड व रोगांचे नियंत...

कोथिंबीरची लागवड कशी करायची?

इमेज
कोथिंबीरची लागवड कशी करायची?  कोथिंबीर ची लागवड कोथिंबीरीची लागवडही भारतात सर्वच राज्यात केली जाते कोथिंबीर ला वर्षभर मागणी असते कोथिंबीर हे रोजच्या जीवनात वापरणारी एक महत्वपूर्ण वस्तू आहे तर या लागवडीसाठी जमीन कशी लागते तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन लागते तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत सुद्धा याची लागवड आपण करू शकतो - कोथिंबीरची लागवड कशी करायची? या पिकाला हवामान कोथिंबीरीची लागवड  ही कोणतेही प्रकारच्या हवामानात करता येते ज्या भागात जास्त पाऊस पडतो कोथिम्बीर है पावसावर अवलंबून आस्ते कोथिम्बीरांची लागवड केल्या नंतर कोथीबिराच्या बारीक कोमवार जोराचा किंवा जास्त पाऊस पडलातर कोथिम्बीराचे कोम्ब खराब होतात तसेच कोथिम्बीर 25 ते 30 दिवासाचे झाले व जास्त प्रमाणात पाऊस झाला तरीही कोथिम्बीरचे पिक खराब होते कोथिम्बीराची ज्या जामिनिमधे लागवड केलिलि आसेल ज्या जामिनिमधे पावसाचे पानी सा चालेले तर कोथिम्बीरा चे पिक खराब होते तरीही आपन शेतकरी मित्रांनो कोणत्या जामिनिमधे लागवड करायची व कोणत्या जामिनिमधे लाग...

शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी?

इमेज
शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी? शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी? उन्हाळा संपल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. पावसाळा जवळ येतो, तेव्हा नव्याने शेती करण्याची सुरुवात होते. तर त्याआधी शेतीची मशागत करणे फार गरजेचे असते, ते म्हणजे शेतीची नांगरणी करणे. शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी? मित्रांनो नांगरणी का केली जाते?   याच विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नांगरणी करण्यासाठी कोणती वेळ महत्त्वाची आहे किंवा शेतीची मशागत का करायची असते? सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची माती भुसभुशीत करावी लागते आणि नंबर दोन म्हणजे मातीच्या खालच्या थरातील कोश मारावी लागतात. नांगरणी केव्हा करायची सकाळ, दुपार की संध्याकाळी हे आपण पाहणार आहोत. नांगरणी का करतात, नांगरणी करण्याच्या पाठीमागे काही उद्दिष्ट असतात. नेमके कारणं असतात. जमीन भुसभुशीत करणे आणि जमिनी खालची माती पूर्ण वर येईपर्यंत मातीमध्ये अनेक अंडकोष निर्माण झालेल्या असतात आणि ते कोश मारण्यासाठी आपल्याला जमिनीची नांगरणी करावी लागते. हे कोश दुसऱ्या पिकासाठी घातक असतात. म्हणून आपल्याला खालच्या मातीची पलटी...

ई पीक पाहणी प्रकल्पांतर्गत आठवडाभरात राज्यात तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांनी नोंदवली माहिती

इमेज
ई पीक पाहणी प्रकल्पांतर्गत आठवडाभरात राज्यात तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांनी नोंदवली माहिती राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक नोंदणी करणे सोपे व्हावे यासाठी मोबाईल ऍप ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  या मोबाईल ॲपच्या माध्यमातून मागील आठ दिवसात पिकांची नोंदणी केले गेल्याचा हा आकडा हा तब्बल एक लाख वीस हजार एवढा आहे. या ई पीक पाहणी उपसभापती वापरा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला असून पुणे जिल्ह्यातही जवळ जवळ चार हजार शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी केली आहे, अशी माहिती ई फेरफार प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. पिकांच्या नोंदी ठेवण्याचे कामे संबंधित तलाठी यांचे असते. तलाठी हे पिक पेरणी अहवाल याच्या नोंदी नमूद करतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून सातबारा उताऱ्यावर असलेल्या पिकांच्या नोंदी या जुन्याच होत्या त्या अद्ययावत होत नव्हत्या. या पार्श्वभूमीचा विचार करून भूमिअभिलेख विभागाने हे ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल मधून पिकाचा फोटो अपलोड करता येतो. तसेच तसेच या मोबाईल ॲप मध्ये अक्षांश व रेखांश याची नोंद होणार असल्याने शेताचे अचू...

ह्यूमिक ऍसिड बनवा घरच्या घरी: ह्युमिक ऍसिड कसे बनवायचे

इमेज
ह्यूमिक ऍसिड बनवा घरच्या घरी: ह्युमिक ऍसिड कसे बनवायचे 🛡️ ह्यूमिक ऍसिड हे खत नसून खूप कमी प्रमाणातील सूक्ष्म अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्य असून ते जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाते. तसेच पिकांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्यूमिक ऍसिड महत्वाचे असते. 🛡️ सध्या पीक उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे, तसेच शेतीच्या खर्चात वाढ झालेली आहे. त्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात तयार करता येईल आणि जमिनीचे आरोग्य सुधारतील अशा विविध पर्यायांपैकी एक आहे ते ह्यूमिक ऍसिड. हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहुयात – ➡️ आवश्यक साधने – ⭕ ५-७ किलो गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, ४० लिटर पाणी २०० ग्राम बेसन पीठ, १ किलो दही , १ किलो गूळ , ४० लिटर क्षमतेचा ड्रम ➡️ तयार करण्याची पद्धती – 1️⃣ २० लिटर पाण्यात शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या. 2️⃣ राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या. 3️⃣ हा ड्रम सावलीमध्ये १०-१...

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही | रस्ता आहे परंतु अडवला आहे | किंवा रस्ताच नाहीये | कसा मिळेल रस्ता ?

इमेज
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही | रस्ता आहे परंतु अडवला आहे | किंवा रस्ताच नाहीये | कसा मिळेल रस्ता ? शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम तुमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता कुणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना रस्ता मागणी अर्ज Rasta magni arj करू शकतात अर्ज केल्याने रस्त्यातील अडथळा दूर करता येतो, तहसीलदार यांच्याकडे याविषयी दाद मागता येते. परंतु तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशा वेळी नवीन रस्त्यासाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते. दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वेगवेगळ्या नियमानुसार मागणी करता येते. या व्यतिरिक्त कलम 143 काय आहे,अगोदरच उपलब्ध असलेला रस्ता अडविणे, रस्त्यावरून शेतात जाऊ न देणे याविषयी कायदेशीर मार्ग कसा काढावा.? वाचा हा सविस्तर लेख शेती रस्ता संपूर्ण माहिती १ पूर्वीपासूनच रस्ता उपलब्ध होता परंतु आता तो अडविला आहे. २) शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता हवा आहे. वरील दोन पर्यायांपैकी आज आपण शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता कसा मिळवावा यासाठी अ...

पपईची शेती : भारतात पपई शेती संपुर्ण मार्गदर्शन

इमेज
पपईची शेती : भारतात पपई शेती संपुर्ण मार्गदर्शन पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपुर असते आणि पपई खूपच रुचकर फळ आहे, हे उष्णकटिबंधीय फळ आहे आणि त्यात अत्यंत मौल्यवान औषधी घटक आहेत. हे मूळतः कोस्टा रिका आणि दक्षिण मेक्सिकोमध्ये आढळते. आता जगातील बर्‍याच देशांमध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जास्त उत्पादन देणारी, पिकाची लागवड सुलभ असल्याने आता भारतातील लोकांनी मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यास सुरवात केली आहे. हे फळ आपल्या स्वास्थ्यवर्धक गुणामुळे आपल्या दैनंदिन आहाराचा एक भाग बनला आहे.पपई जीवनसत्त्वे "ए" आणि "सी" चा चांगला स्रोत आहे, तसेच हे पपाइन नावाच्या सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य समृद्ध आहे जे शरीराची जास्तीची चरबी काढून टाकण्यास मदत करते.पपईची लागवड प्रामुख्याने फळांसाठी केली जाते. इंग्रजीत पपईला papaya म्हणतात. पपइच्या शेतीसाठी उपयुक्त हवामान उष्णकटिबंधीय पीक असल्याने पपईच्या पिकांना जास्त प्रमाणात आर्द्रता आणि तापमान आवश्यक असते. हे थंडीत खुप संवेदनशील पीक मानले जाते. आणि मुसळधार पावसामुळे नुकसान होऊ शकते, हे उपोष्णकटिबंधीय भागात...

गुलाबी बोंड अळीसाठी करा उपाययोजना

इमेज
गुलाबी बोंड अळीसाठी करा उपाययोजना कपाशी पिकात सद्यःस्थितीत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. शेताचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात.   कपाशी पिकात सद्यःस्थितीत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. शेताचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात. राज्यात दरवर्षी जवळपास ४२.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बहुतांश कापूस उत्पादक पट्ट्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे ३८.७४ लाख हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली. सध्या बहुतांश भागातील पीक पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत (४५ ते ६० दिवस) आहे. गुलाबी बोंड अळी ही कपाशीवरील अतिशय उपद्रवी कीड आहे. बीटी कपाशीला ती प्रतिकारक्षम बनल्यामुळे ४-५ वर्षांपासून प्रादुर्भावामुळे लक्षणीय नुकसान होत आहे. राज्याच्या काही भागात लवकर लागवड केलेल्या कपाशीवर मागील १२ ते १५ दिवसांपासूनच प्रादुर्भावाला सुरुवात झाली आहे. शिफारशीत वेळेत लागवड झालेल्या कपाशीवरही काही...

पावसाळ्यातील ही 4 चांगली पिके ; शेतकऱ्यांना देऊ शकतात भरगोस फायदा

इमेज
  पावसाळ्यातील ही 4 चांगली पिके ; शेतकऱ्यांना देऊ शकतात भरगोस फायदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून Mansoon हा शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक वरदान असल्यासारखे आहे. पावसाळ्यामुळे सिंचनाची साधने नसलेल्या ठिकाणीही पिके घेता येतात. डोंगराळ व पठार भागात सिंचन सुविधा नाही. पाणी कमी असलेल्या अशा ठिकाणी पावसाळ्याची अशी काही पिके घेतली जाऊ शकतात. अशा पिकांमध्ये डाळीची पिके प्रमुख आहेत.( Good rainy season crops ) पाणी कमी असलेल्या अशा ठिकाणी पावसाळ्यात काही पिके घेतली जाऊ शकतात. अशा पिकांमध्ये डाळीची पिके प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त अशी काही पिके आहेत ज्यात कमी जास्त पाण्यातही पीक येते. ती पिके फक्त पावसाळ्यात करता येतात. भात शेती हे पावसाळ्यात येणारे शेतकर्‍यांचे मुख्य पीक आहे. या व्यतिरिक्त अशी काही पिके आहेत ज्यात जास्त पाण्यातही पीक येते. ती पिके फक्त पावसाळ्यात करता येतात. 1 – भात शेती :Rice farming तांदूळ म्हणजेच भात पीकाचे ( Rice farming) तांदळाचे प्रमुख उत्पादन भारतात होते.तांदूळ म्हणजेच देशाच्या एक तृतीयांश शेतीत भात पिकाची लागवड केली जाते. तांदळाचे निम्मे उत्पादन भारतातच वापरले जाते. तां...

पीक उत्पादनवाढीमध्ये मुळीचे महत्व

इमेज
पीक उत्पादनवाढीमध्ये मुळीचे महत्व वनस्पतींना किंवा पिकांना एकुण दोन प्रकारच्या मुळ्या असतात. एक पांढरी मुळी आणि दुसरी काळी किंवा लालसर रंगाची मुळी या दोन मुलांचे वेगवेगळे फायदे व गुणधर्म आहे ते आपण समजून घेऊयात. 1) पांढरी मुळी :- पांढरी मुळी ही वनस्पतीचा मुख्य भाग आहे.या मुळीस काही ठिकाणी केशमुळ देखिल म्हणतात. ह्या मुळीचा शेंड्याकडील बराच भाग हा पांढरा असतो. म्हणून ह्या मुळीला पांढरी मुळी म्हणतात. ह्या मुळीचे मुख्य कार्य म्हणजे जमिनितील अन्न व पाणी शोषणे होय. म्हणून या मुळीस वनस्पतीचे खाणारे तोंडदेखिल म्हणतात. ज्या पिकामध्ये पांढरया मुळांची संख्या जास्त म्हणजे खाणारी तोंडे जेवढी जास्त तेवढ़े त्या पिकांची उत्पादन जास्त व पिके सुदृढ असतात.अशा पीकामध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. वनस्पतींच्या पांढरी मुळीच्या तोंडाजवळ जेवढे अन्न किंवा खत येईल तेवढेच खत किंवा अन्न सदर मुळी शोषण करीत असते. दूरचे अन्न किंवा खत सदर मुळ शोषून घेऊ शकत नाही म्हणून जेवढया पिकास पांढरया मुळ्या जास्त तेवढे पिक जास्त अन्न शोषण करीत असते व तेवढे पिक सशक्त व पिकांचे उत्पन्न जास्त असते. 2) काळी मुळी: - या ...

रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना घ्यावयाची काळजी

इमेज
  रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना घ्यावयाची काळजी  रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण हे शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे घेऊन जाणारा मार्ग असून यात शेतासोबतच शेतकऱ्यांच्या मानसिकतेत देखील बदल घडून येतो. नवनवीन शिकण्याची इच्छा आणि चालत असलेल्या प्रथेला छेद देत सेंद्रिय शेतीत रूपांतरण घडवून येते. रूपांतरणाच्या प्रक्रियेत संक्रमण काळ द्यावा लागतो. तोपर्यंत आपली जिद्द आणि धीर सांभाळत प्रयत्न सुरू ठेवावे लागतात. मी आपल्याला ज्या पद्धतीने रूपांतरण सांगणार आहे त्यात संक्रमण काळ कमी लागतो. हा काळ शेताच्या प्रकारानुसार वेगवेगळा असेल. सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना खालील बाबींचा विचार करून आपला आराखडा तयार करावा: १) शेतीचा प्रकार : एकूण क्षेत्रफळ, पिकांचे असलेले वर्गीकरण २) मातीचा प्रकार : मातीचा पृथक्करण अहवाल, मातीत असलेले सेंद्रिय कर्ब, नापीक होत असलेला भाग ३) वातावरण : आपला परिसर कोणत्या पर्जन्य प्रकारात मोडतो, सरासरी तापमान, आर्द्रता ४) गोबर, गोमूत्र, इतर सेंद्रिय पदार्थांचा स्त्रोत ५) उपलब्ध भांडवल, शेतमजूर ६) जवळपासची बाजारपेठ वरील सर्व बाबींची माहिती मिळाल्यानं...

फक्त एक लाखाच्या गुंतवणुकीत फुलावा काकडीची शेती, दरमहा होईल 8 लाख रुपयांची कमाई

इमेज
फक्त एक लाखाच्या गुंतवणुकीत फुलावा काकडीची शेती, दरमहा होईल 8 लाख रुपयांची कमाई शेतीचा व्यवसाय करत असाल आणि पारंपारिक शेतीतून अधिक उत्पन्न मिळत नसेल तर तुमच्यासाठी आम्ही एक जबरदस्त आयडिया घेऊन आलो आहोत. जिथे आपण कमी पैसे खर्च करून जास्त पैसा कमावू शकता. यासाठी उत्तम कल्पना म्हणजे काकडी फार्मिंग (Cucumber Farming) आहे. होय, या व्यवसायात आपल्याला कमी वेळेत अधिक पैसे कमाविण्याची संधी मिळेल. काकडीची लागवड सुरू करून लाखो कमवा या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसांत पूर्ण होतो. तसे उन्हाळ्याच्या काळात काकडीची लागवड होते. परंतु पावसाळ्यात काकडीचे पीक जास्त घेतले जाते. काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते. काकडी लागवडीसाठी जमीन पीएच. 5.5 ते 6.8 चांगली मानली जाते. काकडीची लागवड नद्या आणि तलावाच्या काठावरही करता येते. काकडीच्या शेतीसाठी सरकार देत अनुदान काकडीची लागवड करून लाखोंची कमाई करणारा यूपी येथील शेतकरी दुर्गाप्रसाद आहे. ते म्हणतात की, शेतीत नफा मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात काकडीच्या बिया पेरल्या आणि अवघ्या 4 महिन्यांत 8 लाख रुपये मिळवले. त्याने आपल्या शेतात नेदरलँडच्...

पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे Crop nutrients

इमेज
  पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे Crop nutrients पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता ओळखा अशाप्रकारे. Crop nutrients नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आजचा ब्लॉग मध्ये पिकावरील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची याची पूर्ण माहिती पाहणार आहोत अशाप्रकारे पिकावरील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखा Crop nutrients नत्र (Nitrogen)  झाडाचे खालच्या साईट चे पाने पिवळे पडतात आणि झाडाची वाढ थांबते व मुळाची वाढ पण थांबते याच्यामुळे फळे कमी लागतात आणि फूट कमी होते.nitrogen dioxide   स्फरद (phosphorus)  झाडाची पाने हिरवट होतात आणि लांबट होतात याच्यामुळे वाढ होते आणि पानाच्या मागची बाजू जांभळट होते. phosphorus rich food पालाश (Palash)  पानाच्या कडा तांबटसर होतात आणि पानावरती तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात आणि खोड आखूड होऊन शेंडे गळतातगळतात. Crop nutrients   जस्त (Zinc)  पानाचा आकार कमी होतो आणि पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि काया सुरकुतलेल्या सुद्धा असतात. zinc side effects लोह (Iron) या कमतरतेमुळे पानामध्ये चांगल्या प्रकारे हरिद्रव्य तयार होतनाही त्याच्यामुळे जे नव...

शेतकऱ्यांसाठीची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना तुम्हाला माहिती आहे का?

इमेज
शेतकऱ्यांसाठीची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना तुम्हाला माहिती आहे का? Kisan credit card scheme : मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे. या योजतंर्गत तब्बल २२ भाषांमध्ये केंद्रातील तज्ज्ञ माहिती देतात. मागच्या काही महिन्यांमध्ये ३ लाखांवर शेतकर्‍यांनी शेतीविषयक माहिती घेत आपल्‍या शंकेचे निरसण केले ...

जाणून घ्या ! जमिनीत असलेल्या सुक्ष्म जीवजंतुचे महत्त्व

इमेज
  जाणून घ्या ! जमिनीत असलेल्या सुक्ष्म जीवजंतुचे महत्त्व जमिनीत असंख्य सुक्ष्म जीवजंतु वास्तव्य करीत, असतात. त्यात, बुरशी, बॅक्टेरिया, अँक्टीनोमायसिटीस ह्यांचा समावेश होतो. हे जीवजंतू सेंद्रीय पदार्थाचे विघटन दोन किवा तीन अवस्थेत होते. सेंद्रीय पदार्थाचे विघटन होऊन पिकांना लागणारे अन्नद्र्व्ये नमुद केलेले जीवाणू उपलब्ध करुन देतात. लिग्रीन नावाचा सेंद्रीय पदार्थातील घटक लवकर विघटीत होत नाही, त्यासाठी बराच काळ जावा लागतो, ह्युमस नावाचा पदार्थ सेद्रिंय पदार्थांच्या विघटनाअंती तयार होतो. ह्युमस हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे ह्युमस मुळे पिकांची वाढ होऊन उत्पादन चांगले येते. सेंद्रीय पदार्थ विघटन क्रम सुरुवातीला बुरशी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करते, त्यावरुन तयार होणा-या विघटीत पदार्थावर बँक्टेरियामुळे पुढील विघटन होत राहाते. लवकर विघटीत होणारे पदार्थ जसे साखर, स्टार्च, प्रथिने, सेल्युलोज, हेमीसेल्युलोज इत्यादीवर बँक्टेरिया व इतर सुक्ष्म जीवाणूच्या प्रक्रियेतून त्याचे रुपांतर ह्युमसच्या स्वरुपात करतात या प्रक्रियेत पाणी कार्बनडाय आँक्साईड (वायु) व उर्जा निर्माण होते. लिग्रीनचे विघटन...