पिकांसाठी उपयुक्त आहे गंधक, पिकाच्या वाढीसाठी आवश्यतक अन्नद्रव्य

पिकांसाठी उपयुक्त आहे गंधक, पिकाच्या वाढीसाठी आवश्यतक अन्नद्रव्य गंधक पिकाच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ले तयार करण्यासाठी गंधक काय एक आवश्यक घटक आहे. जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्त्वाचा असून वनस्पती श्वसन क्रिया, तेलनिर्मिती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. जास्त उत्पादन देणारे संकरित वाण प्रत्येक हंगामात गंधकाचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतात. परंतु आपल्याकडून जमिनीमध्ये त्या प्रमाणात गंधकयुक्त खते टाकली जात नाही.आपण जर विचार केला तर नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेट ऐवजी युरियाचा वापर वाढत आहे. पिके जेवढे स्फुरदमुळांद्वारे घेतात तेवढेच गंधकसुद्धा घेतात. या लेखात आपण गंधकाचे पिकांना होणारे फायदे जाणून घेणार आहोत. गंधकाचे महत्व(Importants of sulphur) •गंधकाच्या वापरामुळे उत्पादन आणि लाभांशात वाढ होते. •गंधकाच्या वापरामुळे कृषिमालाच्या उत्पादकतेत व गुणवत्तेत वाढ होते. •गंधकाच्या वापराने जमिनीच्या आरोग्य आणि उत्पादकता टिकवता येते. •गंधकाच्या वापराने नत्राची कार्यक्षमता वाढते व उपलब्धता देखील ...