इथे २ दिवसात खराब होणारं दूध, विदेशात मात्र आठवडाभर टिकतं - असं का?

इथे २ दिवसात खराब होणारं दूध, विदेशात मात्र आठवडाभर टिकतं - असं का? आपल्याकडे दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधाशिवाय जशी चहाची कल्पना आपण करू शकत नाही, अगदी तसंच दुधाशिवाय देवाच्या प्रसादाची कल्पना देखील करवत नाही. अगदी जाहिरातींमधून सुद्धा दुधाचं महत्व प्रत्येक वेळेला दर्शवलं जातं! बॉर्न व्हिटा सारख्या कंपन्या सुद्धा त्यांचं प्रोडक्ट विकलं जावं म्हणून त्यांच्या जाहिरातींमध्ये दुधाचे फायदे लोकांना सांगतात! लहान मुलांना नुसतं दूध आवडत नाही, मग ते पोटात जावं यासाठी अशा कित्येक युक्त्या आणि जाहिराती केल्या जातात! आपल्याइथे तर दूध एक रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून अंबानी पर्यंत सगळ्यांनाच लागत! तबेल्यातल्या दुधापासून थेट बंद टेट्रा पॅक मध्ये येणाऱ्या दुधाचा खप आपल्याला माहित आहेच, शिवाय लोक श्रद्धेच्या पोटी शंकराच्या पिंडीवर जे दूध वाहतात त्याची तर गणनाच होऊ शकत नाही, असो तो ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय असतो! पाहायला गेलं तर प्रत्येक महत्त्वाच्या खाद्यपदार्थामध्ये दुध अतिशय महत्वाची भूमिका बजावतं आणि आपल्या जिभेची चव शांत करतं. महाराष्ट्रात तर कित्येक दुधाचा धं...