पोस्ट्स

फायद्याची फणस शेती

इमेज
फायद्याची फणस शेती फणस हे नगदी पीक म्हणून फायदेशीर ठरू शकते. दक्षिणेकडील राज्यांतील फणस शेती पाहिल्यास याची साक्ष पटू शकते. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये या फळाला फार वरचे स्थान आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत फणसाचे विविध पदार्थ विकून आणि निर्यात करून चांगली कमाई केली जात आहे. मोठय़ा प्रमाणावर फणस लागवड झाल्यास कोकणात त्यावर मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकेल. हवामान व जमीन : या वृक्षाला थंड हवामान आणि तीव्र उन्हाळा सोसत नाही, पण उष्ण-दमट हवामान आणि मध्यम पाऊस असणाऱ्या भागात त्याची चांगली वाढ होऊ शकते. लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर करता येते. पण खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत वाढ चांगली होते. काळ्या चिकण मातीत फळे उशिरा आणि कमी धरतात. समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये हा वृक्ष वाढू शकतो. पण १२०० मीटर उंचीवरच्या भागातील फळे कमी दर्जाची असतात. फणसाच्या जाती : फणसाच्या फळांचे कापा आणि बरका (रसाळ) हे दोन मुख्य प्रकार पडतात. कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. कापा जातिचे फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो....

शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार..

इमेज
शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार.. भारतीय शेती पद्धतीची (Indian Agriculture)परंपरा फार पुरातन आहे. प्राचीन काळापासूनच निरनिराळ्या शेती पद्धतींचा अवलंब केला जात आहे. (Weather) हवामान, जमिनीचा प्रकार (Types of soil )इ. गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागांत विभागली गेली आहे. या कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे. Secondary Tillage भारतात दरवर्षीच पिकातील तण नियंत्रणासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात पेरणी झाल्यानंतर तीन, सहा, किंवा नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी करतात. प्रत्येक शेतीची सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते, यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते कोळपणीचे फायदे : • कमीत कमी खर्चात व वेळत तण निंयञण होते. • जमिनीत हवा खेळती राहते तसेच उत्पादनात देखील वा...

जाणून घ्या वेस्ट डिकंपोजर विषयी महत्वाच्या बाबी ओळख, वापर, बनविण्याच्या पद्धती, फायदे

इमेज
जाणून घ्या वेस्ट डिकंपोजर विषयी महत्वाच्या बाबी ओळख, वापर, बनविण्याच्या पद्धती, फायदे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. गायीच्या शेणातील जिवाणू पासुन तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.It can be used in various ways for soil fertility, crop growth and protection.ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. साहित्य - वेस्ट डि कंपोजर २ किलो गुळ२०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)२०० ल...

चुकून तणनाशक फवारले गेले तर काळजी करू नका करा फक्त हे सोप्पे उपाय

इमेज
चुकून तणनाशक फवारले गेले तर काळजी करू नका करा फक्त हे सोप्पे उपाय कोणत्याही पिकावर चुकून आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले असल्यास ,त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो स्पर्षजन्न तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, 15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी(डायअमोनियम फॉस्फेट ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . टीप- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी करा Spray solution of jaggery and DAP on affected crop 4 times at 7/7 hour interval.केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो.बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2...

*असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन*

इमेज
🐌 * शंखू गोगलगायींपासून पिकांना धोका*  गोगलगाय ही एक बहुभक्षी प्रकारची किड असून. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे नुकसान करते. गोगलगाय किडीच्या नियंत्रणासाठी  १) खुराकाच मोकळं पोत एक किलो गुळाच्या पाण्यात बुडवून संध्याकाळी शेतात टाकावीत, त्यावर गोगलगाय आकर्षित होईल नंतर ते जमा करून त्यावर औषधाची फवारणी करावी  २) मोसंबी, डाळिंब,व इतर बागेत दरवर्षी खोडावर बोर्डो पेस्ट लावावे म्हणजे गोगलगाय झाडावर चढणार नाही.  ३) गोगलगाय नियंञणासाठी मेटाअल्डीहाइड २.५%असणारे स्नेलकिल हे मॉलुस्कीसाईड वापरावे  ४) तंबाखू पावडर ची शेताच्या सर्व बाजूने रेषा ओढायची म्हणजे गोगलगाय आत येणार नाही.  🌱सद्य परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोगलगायींना वेळीच ओळखून उपाययोजना करावे.  🧐 * असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन* 👇 ▪️शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा र...

सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा

इमेज
सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा आपल्या जमिनिमधे साधारणपणे चुनखडीचे ( C2CO3) कँल्शियम कार्बोनेट चे प्रमाण 4 ते 5% पेक्षा कमी असयला हवे.ज्या जमिनिमधे मुक्त चुनखडीचे प्रमाण 8 ते 9% च्या पुढे असते ( चुनखडीयुक्त व पांढरी जमीन) त्या वेळी जमिनितुन 6 सूक्ष्म खतांपैकी फेरस (लोह) या खताची अजिबात उपलब्धता होत नाही.त्याच्या खालोखाल झिंक आणि मॉलिब्डेनम खताची उपलब्धता फार कमी असते.म्हणून अशा जमिनिमधे सुरुवातीला सोयाबीन पिवळे पडते. त्यामुळे अशा जमिनित 1) सोयाबीन ची वाढ खुरटी होते व पाने पुर्ण पणे पिवळे पडते2) झाडाची वाढ मंदावते व पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात3) सर्व पाने हरीतद्रव्यरहित राहुन करपल्या सारखी दिसतात हे लक्षात घ्या - सोयाबीन पिवळे पडण्यामाघे पानामधे संपुर्ण फेरस (लोह) खताची कमतरता असते.चुन खडियुक्त शेतामधुन पिकाला फेरस ( लोहाची) उप्लब्धता होत नसल्या मुळे पानामधे लोहाची कमतरता दिसते. अनेक शेतकरी या पिवळ्या सोयाबीनला *यल्लो मोझँक व्हायरस असे संबोधतात.आणि कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारण्या घेउन खर्च वाढवतात.आपण हे समजुन घेतले पाहिजे की पिकाच्या पा...

कापूस पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

इमेज
कापूस पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स BT कापसाला मध्यम व भारी जमीन खुप मानवते.त्यासाठी अशाच जमिनीत कापसाची लागवड करावी. तसेच सिंचन सुविधा नसलेल्या हलक्या जमिनीत कापुस लागवड शक्यतो टाळावी.जमिनीच्या प्रकारानुसार समतल पेरणी,जमिनीच्या उताराला आडवी पेरणी,सरी वरंबा पध्दतीने मशागत इ. मुलस्थानी जलसंधारण तंत्राचा अवलंब करावा.कोरडवाहू क्षेत्रामध्ये बिगर बी.टी.कपाशीच्या सरळ वाणांची अतिघन पध्दतीने लागवड केल्यास बी.टी. वाणा इतकेच उत्पादन मिळू शकते.सरळ वाणांचे बियाणे घरच्या घरी तयार करुन त्याचा वापर करावा.बीबीएफ यंत्राचा वापर करुन पेरणी करावी, जेणेकरुन पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत होऊन ओलावा अधिक काळ टिकतो व अतिपावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.यामुळे बियाणे, खत व मजुर खर्चात बचत होते.  कापूस पिकात भूईमूग (१:१), मूग किंवा उड़ीद (१:१), सोयाबीन (१:१ किंवा २:१) या आंतरपीक पध्दतीचा अवलंबकरावा.आपल्या विभागामध्ये कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्य योग्य कालावधीमध्ये पेरणी केल्यास कीड व रोग यांचा प्रादुर्भाव टाळता येतो.तण नियंत्रणासाठी पेरणीपुर्व तणन...

तज्ञ सांगताहेत अशी करा बीजप्रक्रिया पिकांना मोठा फायदा होईल

इमेज
तज्ञ सांगताहेत अशी करा बीजप्रक्रिया पिकांना मोठा फायदा होईल मान्सून पूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली असून, बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करीत नाहीत, बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात. कंपनी कडून आलेल्या बियांण्याला गौचो सारख्या औषधांची बीजप्रक्रिया केलेली असते,आपण ते बियाणे लागवड करतो.आपल्या पिकावर कमी रोग पडावेत, तसेच नत्र, स्फुरद,पालाश स्थिरीकरण व विरघडवण्यासाठी विविध प्रकारच्या जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. त्यात ऍझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, विविध प्रकारची बुरशी नाशके यांची बीज प्रक्रिया केल्यामुळे काय फायदे होतात व कोणत्या कोणत्या जिवाणूंची व कशी कोणत्या क्रमाने बीजप्रक्रिया करावी या विषयीची माहिती आपण आज पाहू.बियाणद्वारे उदभवणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया हा कमी खर्चाचा उपाय आहे.यावरुन बियाणे प्रक्रियेचे महत्व आपल्या लक्षात येईल,या अनुषंगाने शेतकरी बांधवांना आवाहान करण्यात येते की कोणतेही बियाणे बिजप्रकिया केल्याशिवाय पेरु नये. जिवाणु संवर्धकाची बिजप्रकिया -२५० ग्रॅम जीवाणु सवर्धकाचे पाकिट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे १ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅ...

जनावरांचे वय ओळखायचे तरी कसे? वाचा!

इमेज
जनावरांचे वय ओळखायचे तरी कसे? वाचा! जनावरांचे वय ओळखता येणे अनेक अंगानी गरजचे आहे. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. साधारणतः विचार केला तर जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येतो. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील… अ) जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून ओळखा : 1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते. 2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील. 3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय. मर्यादा काय? : यामध्ये नेमके वय समजणे कठीण आहे. बाजारात विक्रीकरिता जनावरे पाहिल्यानंतर फजिती होऊ शकते. ब) जनावरांची शिंगे व वलयांची संख्या : 1) जनावरांची शिंगे बारकाईने पहिली तर त्यावर वलय स्पष्ट दिसते. 2) जनावरांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शिंगांवरील वलयांची संख्या व आ...

Seed Germination process : बियाण्यांची उगवण क्षमता पेरणाधीच कशी तपासायची?

इमेज
Seed Germination process : बियाण्यांची उगवण क्षमता पेरणाधीच कशी तपासायची? दुकानातून बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकरी त्यांची थेट शेतात पेरणी करतो आणि मग जवळपास आठवड्याभरानं ते पाहायला जातो. त्यावेळी त्याची निराशा होते. कारण, बहुतेक ठिकाणी बियाणं उगवून आलं नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. अशावेळी शेतकऱ्याला पुन्हा एकदा बियाणं खरेदी करावं लागतं. यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो. थोडक्यात काय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येतं. पण, हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो. म्हणजे पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणं पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतो. ते कसं याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं. बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात. पहिली म्हणजे गोणपाट पद्धत . या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपास...

*पीक फेरपालटीचे फायदे

इमेज
*पीक फेरपालटीचे फायदे * *पीक फेरपालट ही एक प्राचीन  कृषी पद्धती आहे. वर्षानुवर्षे प्रत्यक्ष अभ्यासाने यात बदल होत आलेले आहेत.*  *१) जमिनीची सुपीकता वाढते.* विशिष्ट पीक हे जमिनीत विशिष्ट प्रकारची तत्वे सोडतात. तर काही विशिष्ट प्रकारची अन्नद्रव्ये शोषतात. त्यामुळे पिकांच्या फेरपालटाने जमिनीतील या पोषक तत्वांचे संतुलन होते व जमिनीची सुपिकता वाढते *२) पीकांचे उत्पादन वाढते.* फेरपालटीमुळे जमिनीतील न वापर झालेल्या अन्नद्रव्यांचा, साधनांचा वापर होतो व पीकांचे उत्पादन वाढते.  *३) मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते.* विशिष्ट पीकांमुळे मातीतील विशिष्ट प्रकारचे जिवाणू समृद्ध होत असतात त्यामुळे मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते त्यामुळे  माती सुपीक व संतुलित बनते.   *४) रोग व कीडींना आळा बसतो.* फेरपालटीने रोग व कीड यांचा जीवन क्रम थांबतो. त्यांचे निवासस्थान नसल्याने त्यांची पुढील पिढी बंद होते. रोग व किडे पुढील पीकांत संक्रमित होण्याचा धोका टळतो.  *५) मातीच्या संरचनेत सुधारणा  होते.* पीक फेरपालटीने मातीच्या संरचनेत ही लक्षणीय सुधारणा होऊन परिणामी उत्प...

ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे

इमेज
ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे ज्या जमिनीमध्ये सातत्याने उसाची लागवड करण्यात येते अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केला जातो. अशा प्रकारच्याजमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण खूप जास्त प्रमाणात झाल्यानेजमिनीमध्ये त्यांची कमतरता आढळते. त्यामुळे ऊस पिकातील कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन शिफारशीत मात्रेत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. ऊस पिकातील जोमदार वाढ आणि उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे आणि त्यांचे कार्य जाणून घेऊ.   ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य आणि कमतरतेची लक्षणे           ऊस पिकातील लोहाचे कार्य 1- हरितद्रव्य तयार करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. 2- पानांचा रंग गडद हिरवा तयार होण्यास मदत होते. 3- इतर अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी मदत करते. 4- झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक. 5- नवीन येणारी पाने पिवळी दिसतात व शिरा ...

एप्रिल महिन्यात करा या पिकांची पेरणी , मिळेल भरपूर नफा.

इमेज
एप्रिल महिन्यात करा या पिकांची पेरणी , मिळेल भरपूर नफा. एप्रिल महिन्यात पेरणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती एप्रिल महिना असा आहे की रब्बी पिकांची काढणी झाली आहे आणि ही पिके मंडईत विकून शेतकरी शेतीपासून मुक्त झाला आहे. यानंतर शेतकरी पुढील जैद पिकांच्या तयारीला लागले आहेत. एप्रिलमध्ये गव्हाची काढणी आणि जूनमध्ये भात/मका पेरणी दरम्यान, शेत सुमारे 50 ते 60 दिवस रिकामे राहते. सध्या, शेतकरी या रिकाम्या शेतात फळबाग, भाजीपाला लागवड आणि अनेक नगदी पिके करून भात/मका पेरण्यापूर्वी 50 ते 60 दिवसांत रोख कमाई करू शकतात. यावेळी, शेतकरी त्यांच्या काही कमकुवत शेतात हिरवळीचे खत तयार करण्यासाठी धैंचा, चवळी किंवा मूग इत्यादी पिके घेऊ शकतात. या प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याबरोबरच खताच्या खर्चातूनही सुटका होते. कारण या पिकांपासून उत्पन्न मिळाल्यानंतर शेतकरी जूनमध्ये पेरणी केलेल्या पिकाची लागवड करण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस किंवा मका पेरणीपूर्वी 10-15 दिवस आधी मातीची नांगरणी करून जमिनीचे आरोग्य सुधारतो. आणि जमिनीची सुपीकता वाढते. या महिन्यात तुमच्या शेतातील मातीची चाचणी करून ...

ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे

इमेज
ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे उन्हाळा लागल्याने पाण्याची टंचाई सगळीकडे भासू लागते त्यामुळे त्यामध्ये पाणी याला खूप महत्त्वाचे स्थान आहे उन्हाळा लागल्याने तीव्र उष्णता प्रत्येक प्राण्यांना जाणवणे हे साहजिक च आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुद्धा पाण्याची ची टंचाई भासू लागते. प्रत्येकाला पाण्याची नितांत गरज असते जसे माणसाला पिण्यासाठी, वापरण्यासाठी लागते. तसे च इतर प्राण्यांना सुद्धा पाण्याची नितांत गरज असते ती पिण्यासाठी. त्यामुळे उन्हाळा लागला की आपण पाण्याचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. जेवढे पाणी लागते तेवढ्याच पाण्याचा वापर केला पाहिजे व आपल्या सोबतच अनेक जीवांना सुद्धा पाण्याची गरज पूर्ण होऊ द्यायला पाहिजे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाच्या कालावधीत शेतीत पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. ते कशा प्रकारे करावे शेतकरी बंधूंनो सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जात आहे.या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा. भूपृष्ठावर मोठ...

दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...

इमेज
दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...    आज  ८ मार्च जागतिक महिला दिन तेव्हा या जागतिक महिला दिनाच्या संपूर्ण माता,भगिनी ,बंधू व सर्व देशवासीयांना कृषी महाविद्यालय रिसोड (करडा) व कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम व माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ग्रामीण भारतातील शेतकरी महिला, ग्रामीण युवती एकदा जागृत व प्रज्वलित झाली की तिच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राची प्रगती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भगिनी माता आणि बंधुंनो 2001 च्या जनगणनेप्रमाण  ग्रामीण भागातील महिला साक्षरता दर साधारणता 31.6% आहे. कृषी किंवा शेतीमधील विविध विविध कामाचा विचार केल्यास साधारणपणे शेतीमधील जमीन तयार करण्याच्या कामात महिलांचा सहभाग 32%, पेरणी व शेत स्वच्छता मोहिमे मधील महिलांचा सहभाग 80 % टक्के, आंतरमशागतीच्या कामांमधील सहभाग 86% कापणी, मळणी उपननी, धान्य वाळवणे स्वच्छ करणे तसेच धन्याची साठवणूक करणे इत्यादी कामात 84% इतका महिलांचा सर्वसाधारण सहभाग असतो. याचाच अर्थ असा की शेतीच्या विविध कामातील महिलांचा सहभाग जवळजवळ  50 % ते 75 %  आहे. ...

उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र

इमेज
*_🌱 उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र 🌱_* * *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *_ᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝ_* _कडधान्य पिकातील अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे अतिमहत्वाचे पीक असून, महाराष्ट्रात त्याचे सुमारे ३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे, विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केला जातो. परिणामी, कमी पाण्यात उत्पादन, जमिनीचा पोत टिकून राहणे, नत्राची पूर्तता करणे अशा बाबी साध्य होतात, या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो, पीक तयार झाल्यानंतर शेंगा तोडून घेऊन ते जमिनीत गाडल्यास हिरवळीच्या पिकांप्रमाणे परिणाम मिळू शकतात._ _*🌱 जमीन :* मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते, चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळांवरील रायझोबिअम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. त्यामुळे रोपे पिवळी पडून उत्पादनात घट येते. साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते._ _*🌱 हवामान :* २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान चांगले. मात्र ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानातही हे पीक चांगले येते, खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी ह...

आला उन्हाळा पिकांचे आरोग्य सांभाळा…! उन्हाळी सोयाबीनवर कीड, तर हरभरा काढणीच्या अवस्थेत, वाचा तज्ञांचा सल्ला |

इमेज
आला उन्हाळा पिकांचे आरोग्य सांभाळा…! उन्हाळी सोयाबीनवर कीड, तर हरभरा काढणीच्या अवस्थेत, वाचा तज्ञांचा सल्ला | पीक व्‍यवस्‍थापन हरभरा : वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू : लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी सोयाबीन : उन्हाळी सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करावीत व पिका...

फेब्रुवारी महिन्यात शेती करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, पीक उत्पादन वाढेल

इमेज
फेब्रुवारी महिन्यात शेती करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, पीक उत्पादन वाढेल एकीकडे फेब्रुवारी महिना भाजीपाला पेरणीसाठी चांगला मानला जातो, तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात वातावरणातील बदलामुळे अनेक रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत ICAR-भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना रोग आणि किडींच्या धोक्यापासून पिके वाचवण्यासाठी आवश्यक सल्ला दिला आहे. हवामानातील बदलाचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो, असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे पिकांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पिकांवरील रोग आणि कीटकांसाठी सल्ला भारतातल्या उत्तरेकडील भागात येत्या काळात पावसाची शक्यता आहे , त्यामुळे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची पिके शेतात उभी आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारे फवारणी करू नये, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच सिंचन करू नये. गव्हातील गंज रोगाचा धोका या हंगामात गहू पिकावर पिवळ्या गंज रोगाचा धोका असतो. अशा परिस्थितीत पिकावर विशेष लक्ष ठेवावे, ...

🥜तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे 🥜

इमेज
*_🥜 तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे 🥜_* _उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे पेरणीसाठी तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. महाराष्ट्रात तेलबियांची पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. जमिनीत पुरेसा ओलावा भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे हवामान या बाबी पिकाच्या वाढीस पोषक ठरतात._ *_🎯 जमीन_ * _मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू, सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन लागवडीस योग्य असते. या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोसण्यासाठी मदत होते._ *_🎯 पूर्वमशागत_ * _जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे._ *_🎯 लागवडीसाठी सुधारित वाण_ * _*१ ) वाणाचे नाव :* फुले उन्नती_ _*◆प्रकार :* उपटी_ _*◆प...

ढेमसे लागवड विषयी

इमेज
ढेमसे लागवड विषयी लागवड:              एका ठिकाणी दोन बिया टोकून 2 फुट अंतर ठेवावे.  * लागवडीसाठी जाती * - सागर  नरेश, महिको टिंडा,अंकूर टिंडा,कलश चित्रा इत्यादी  * खत व्यवस्थापन * -  एकरी पिकास 200 किलो निंबोळीपेंड, 2 ट्रेलर शेणखत, 2 किलो पीएसबी, 2किलो ट्रायकोडर्मा, 1.5 (दिड) पोते युरीया,2 पोते सुपर फॉस्फेट, 25 किलो पोटॅश देणे,  युरीया खत 2 ते 3 हप्त्यांत मुळापासून थोडे अंतर ठेवून द्यावे. त्याशिवाय झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, एकरी 3 ते 4 किलो प्रत्येकी देणे. तसेच दोन किलो अँझोटोबॅक्टर देणे.          * ढेमसे लागवड सविस्‍तर माहिती-* 👇                    ढेमसे या पिकास हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची जमीन लागते. हलक्‍या जमिनीत हे पीक लवकर तयार होते. या पिकास उष्ण हवामान मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही. रोग व किडींचे प्रमाण वाढते.भरपूर सूर्यप्रकाश या पिकाला चांगला मानवतो. ढेमशाची लागवड पा...