पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाफसा वाफसा म्हणजे काय ?

 *_🥀वाफसा वाफसा म्हणजे काय ?🥀_* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* _कृषि विध्यापीठे खोटे बोलतात की, मुळ्यांना पाणी पाहिजे पण नैसर्गिक सत्य हे आहे की कोणत्याही झाडाच्या मुळीला पाणी नको झाड पाणी पीत नाही किंबहुना मुळी पाण्याला स्पर्शही करत नाही मुळ्यांना पाणी नको तर वाफसा हवा आपण बीजामृत संस्कार केला जीवाम्रुत देऊन आच्छादन केले पण मुळीजवळ वाफसा नसेल तर पिकाचीत वाढ होणार नाही ही चारही तत्वे ( बीजाम्रुत जीवाम्रुत आच्छादन व वाफसा ) एकमेकाशी इतके जुळलेले आहेत की यापैकी एकाला ही टाळता  येणार नाही "This is complete package of practices "ही चारही तत्वे अंमलात आनाविच लागतील_ *_उदा_* *_१) गादी वाफ्यात कांदे किंवा लसुण लावतो :_* _वाफ्याच्या काटाचे कांदे मोठे होतात कारण तेथे वाफसा असतो_  *_२) उंच सखल भाग :_* _त्यात तूर पेरली सखल भागातील तूर खुरटी व उंच भागातील तूर जोमदार दिसेल कारण वाफसा जमिनीच्या पृष्ठभागाखाली मुळ्याच्या परिसरात दोन माती कणाच्यामध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये ५० % पाण्याची वाफ व ५० % हवा यांचे सन्मिश...

पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे

 *पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे* *◆ केळी :* 1) केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात.  2) झाडांची  वाढ खुंटते व लहान फळे तयार होतात व पाने पिवळी पडतात.  *◆ वांगी :* 1) गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांची अपरिपक्व फुले गळतात, उत्पादनात घट होते.  *◆ कोबी :* 1) कमतरतेमुळे नवीन पानाचे काठ पिवळे पडतात.  2) नवीन पानांचा आकार चमच्याच्या किंवा कपासारखे होऊन निमुळता होत जातो. त्यामुळे गड्डा तयार होत नाही.  *◆फ्लॉवर :* 1) फुलकोबी गंधकाच्या कमतरतेला अतिशय संवेदनशील आहे.  2) लागवडीपासून एक महिन्याच्या आत पानाच्या कडात पिवळसर पडून खाली निमुळत्या होतात.  3) गंधकाच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होते.  *◆ हरभरा :* 1) पानांची टोके पिवळसर हिरव्या रंगाची होतात. कमतरतेमुळे पानाला लाल रंग येतो.  2) नवीन अपरिपक्व पाने वाळतात व झाडांच्या शाखा व्ही आकाराच्या होतात.  *◆ मिरची :* 1) गंधकाच्या कमतरता असल्यामुळे झाडांना फुलधारणा उशिरा होऊन फुलांच्या संख्या कमी होते व उत्पादनात घट होते.  2) नवीन कोवळ्या पानांच्या शेंड्यावर पिवळसर ठिपके दिसून य...

गंधक एक आवश्यक अन्नद्रव

 *गंधक एक आवश्यक अन्नद्रव* गंधक हे पिकांच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्यक अन्नद्रव्य आहे. पूर्वी शास्त्रज्ञ गंधकाला दुय्यम अन्नद्रव्य संबोधित होते. अथापि त्याची आवश्यकता वाढल्यामुळे त्याचा मुख्य अन्नद्रव्यामध्ये समावेश करण्याची वेळ आली आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे. जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्वाचा असून वनस्पती श्वसनक्रिया, तेल निर्मीती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्वपूर्ण भूमिका करते. जमिनीमधून पिके विशेष जास्त उत्पादन देणारे संकरित वाण दर हंगामात गंधकाचे मोठया प्रमाणावर शोषण करतात. परंतु जमिनीमध्ये गंधकयुक्त खते त्याप्रमाणात टाकली जात नाहीत. नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेट ऐवजी युरियाचा वापर वाढतो आहे. जवळजवळ स्फुरद इतकेच गंधक बहुतेक पिके जमिनीतून मुळाद्वारे घेतात. विशेषतः तेलबिया पिकाची गंधकयुक्त खताची गरज जास्त असते. मात्र त्याची जमिनीत भरपाई त्याप्रमाणात केली जात नाही. *गंधकाचे महत्व* गंधकाच्या वापरामुळे उत्पादन आणि लाभाशांत वाढ होते. गंधकाच्या वापरामुळे कृषिमालाच्या उत्पादकतेत व गुणवतेत वाढ होते. गंधकामुळे जमिनीचे आर...

संभाव्य तूर आयात रोखण्यासाठी

 *_संभाव्य तूर आयात रोखण्यासाठी..._* _"तूरीचा चार लाख टन आयात कोटा यंदा एप्रिलमध्येच जारी करावा", ही मागणी घेवून ऑल इंडिया डाल मिल असोसिएशनचे पदाधिकारी पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहेत._      _"गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तूर आयात कोटा मंजूर केला होता. यंदा एप्रिलमध्येच म्हणजे लवकर मंजूर करावा," अशी असोसिएशनची मागणी आहे. गेल्या वर्षीच मोझांबिकडून वर्षाकाठी दोन लाख टन तूर आयातीच्या पंचवार्षिक कराराला वाणिज्य मंत्रालयाने मुदतवाढ दिली आहे. म्हणजे, डाल मिल असोसिएशन त्यांच्या गरजेसाठी चार लाख टन आयातीचा कोटा मागतेय. शिवाय, मोझांबिककडून दोन लाख टन अशी एकूण सहा लाख टन तूर आयातीचा टांगती तलवार आहे._      _तूरीला किफायती बाजारपेठेत कमीतकमी थोडा ताण आवश्यक आहे. आयात जर आयात आयात आयात आयात................................................................................ डोलमिल असोसिएशने जर तूर आयातीसाठी पाठपुरावा करा, परंतु पक्षपात करणे आणि संबंधित जीवघेण्यांना तूर आयात करावे लागणार आहे.      _तूर उत्पादक विभाग हितैषी केंद्र तूर आयात कर...

ग्राहक म्हणतो : तुमच्या किमती खूप जास्त आहेत_

*_😃ग्राहक म्हणतो : तुमच्या किमती खूप जास्त आहेत_* 📌 या विषयावरचा हा महत्वाचा लेख होऊ शकतो, याचं कारण असं आहे की, ग्राहक याच मुद्द्यावर आपल्यापासून दूर जायला बघतो किंवा आपल्याला ब्लॅकमेल करून किमती कमी करून आपले उत्पादन किंवा सेवा पदरात पाडून घ्यायला बघतो. आपल्या उत्पादनाचा किंवा सेवेचा दर्जा उच्च प्रतीचा असेल? तर अशा परिस्थितीमध्ये एक विक्रेता म्हणून किंवा एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा आपला जीव गुदमरतो ....तर अशावेळी आपण या ग्राहकाला कशाप्रकारे हँडल केलं पाहिजे?ते खालील काही स्टेपमध्ये वाचा *(1) Do not flinch*  बऱ्याच वेळेला ग्राहक त्याला काहीही माहीत नसताना उगाचच टाकायचा म्हणून अशा प्रकारचा वाईड बॉल टाकतो तो बघतो तुम्ही क्रीजच्या बाहेर येतात किंवा नाही ?तेव्हा ज्यावेळेला ग्राहक अशा प्रकारे आपल्या किंमतीवर ऑब्जेक्शन घेईल त्या वेळी आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव बिलकुल बदलू देऊ नका, काय होत? समोरचा आपल्याला किंमत कमी करा म्हंटला की आपण नर्वस होतो, आणि ही नर्वसनेस लपत नाही.... टेन्शन असलं तरी रिलॅक्स रहा. घाबरून जाऊ नका अर्ध्यापेक्षा जास्त ग्राहक फक्त आपल्याला चेक करत असतात, की जमतय क...

🌲सागवृक्ष लागवड व संवर्धन माहिती 🌲

 *_🌲सागवृक्ष लागवड व संवर्धन माहिती 🌲_* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* *_साग झाडाची लागवड दोन पद्धतीने करता येते._* *१)*_सागजडी लावून_ *२)*_पिशवीत रोपांची लागवड करून_      _सागजडी लावून लागवड करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्‍यतो लगेच लागवड करावी. जडी तयार केल्यापासून ८ ते १० दिवसांतच लावावी. सागाची जडी लावताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीत जोवर ऊब आहे तोवरच लागवड करावी लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात पहारीने जडीच्या उंचीची छिद्रे करावीत खोडाचा भाग जमिनीच्यावर ठेवून मुळांचा भाग जमिनीत लावावा. नंतर आजूबाजूची माती पक्की दाबावी सागजडीच्या तळाशी व आजूबाजूस पोकळी राहून पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी_ *_🪴जातींची निवड :_* _भारतीय साग, ऑस्ट्रेलियन साग (आकेशिया मॉंजियम) आफ्रिकन साग बर्मासाग आणि पांढरा साग (शिवण) अशा सागवानाच्या विविध लागवडीयोग्य जाती आहेत, त्यांपैकी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन साग अधिक प्रचलित आहे भारतीय सागाची लागवड केल्यास तो कापणीयोग्य होण्यासाठी २५ ते ३० वर्षे लागतात. ऑस्ट्रेलियन साग लागवडीपासून ...

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?

 *_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?_* _कृषी चिकित्सालय मार्फत उपलब्ध होणाऱ्या NPK जिवाणूंची माहिती खाली दिलेली आहे. सर्व जिवाणू आम्ही एकत्र करून देत असून याचा प्रति लिटर खर्च फक्त १/- रुपया इतका कमी आहे.(©️कृषी चिकित्सालय 9404382365 )_ *_१) नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू :_* _रायझोबियम, अझोटोबॅक्टर, एझोस्पायरिलम ही नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत, तर सुडोमोनस, बॅसीलस जिवाणू, ही स्फुरद विरघळविणारी जिवाणू खते आहेत. जिवाणू खताचे वेगळेपण असे आहे की, पिकांना आवश्यक असणारे कुठलेच मूलद्रव्य त्यात नसते. ही खते पिकांना लागणारी अन्नमूलद्रव्ये हवेतून किंवा जमिनीतून उपलब्ध करून देतात. जसे, नत्रवायू हवेत असतो, पण तो पिकांना घेता येत नाही. रायझोबियम जिवाणू द्विदल पिकाच्या बियाणांस चोळून पेरणी केली असता, पिकांच्या मूळांवर ते ग्रंथी स्वरूपात वास्तव्य करतात. तिथे त्यांची भरमसाट वाढ होते. स्वत:चे अन्न पिकाकडून मिळवित असतानाच हवेतील नत्र वायूचे स्थिरीकरण ते करतात व हा नत्र पिकांना (©️कृषी चिकित्सालय 9403482365 ) अमोनियाच्या स्वरूपात मुळांवाटे उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळविणारे जिवा...

बेदाणा निर्मितीच्या विविध पद्धती

 *_🥀बेदाणा निर्मितीच्या विविध पद्धती🥀_* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* *_१) नैसर्गिक बेदाणा :_* _गडद राखी निळसर रंगाचे नैसर्गिक लव कायम असलेले किंचीत जाड सालीचे भरपूर गर व एक विशिष्ट प्रकारचा स्वाद असणारे (ऑक्सीडाईज्ड फ्लेव्हर) हे बेदाणे असतात. हे बेदाणे कोरडे चिकट नसलेले तेलविरहीत आणि साठवणूकीत गोळा न बनणारे असे असतात. सुकविण्याची क्रिया द्राक्षबागेतच केली जाते. यासाठी उत्तरेच्या बाजूस मातीचा चढ कमी केला जातो आणि दक्षिणेकडे ५% उतार जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा या हेतूने केला जातो. अकाली पावसाने साठणारे पाणी वाहून जाण्याची सुविधा देखील यामुळे निर्माण होते. द्राक्षघड हे एका थरामध्ये पसरविले जातात. मोठे घड २ ते ३ तुकड्यात विभागले जातात. मणी सुरकुतल्यानंतर म्हणजेच १ ते २ आठवड्यानंतर हे वर खाली केले जातात. बोटांमध्ये मणी दाबल्यास त्यातून रस बाहेर येत नाही अशी स्थिती येईपर्यंत ही क्रिया चालू ठेवतात. अशा स्थितीत मणी सुकले आहेत हे निश्चित होते. यानंतर ज्या कागदी ट्रेमध्ये हे मणी सुकविण्यासाठी ठेवलेले असतात ते ट्रे गुंडाळले जातात आणि अशा गुंडाळलेल्या स्थितीत २...

रब्बी ज्वारी

 *_रब्बी ज्वारी_* *_बळीराजा_* *_✨आरोग्यदायी ज्वारी_* _◆ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, हृदयरोग्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते._ _◆भूक वाढते, ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी केला जातो._ _◆पचनसंस्थेतील वायुदोष कमी होतात, अॅसिडीटी कमी होते._ _◆आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण कमी करणे शक्‍य_ *_✨प्रति १०० ग्रॅम ज्वारीतील महत्त्वाचे घटक_* _●ज्वारीच्या दाण्यात ओलावा (आर्द्रता) ८ ते १० टक्के, प्रथिने ९.४ ते १०.४ टक्के, तंतूमय घटक १.२ ते १.६ टक्के_ _●खनिज द्रव्ये १.० ते १.६ टक्के,_ _●उष्मांक ३४९ किलो कॅलरीज_ _●कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम,_ _●किरोटीन (प्रो-व्हिटॅमीन ए) ४७,_ _●थायमीन ३७ मिलिग्रॅम_ _लायसीन, मिथीलोअमाईन ही आवश्‍यक अमिनो आम्ल मर्यादित प्रमाणात आढळतात._ *_✨ज्वारीचे पदार्थ -_* _हुरडा, रवा, लाह्या, पोहे, घुगऱ्या, दशमी, थालीपीठ, उत्तप्पा, डोसा, इडली, कुरडई, चकली, आप्पे, चिवडा, खाकरा, अंकित, भातवड्या, पापड, आंबील, मसाल्याचे वडे, बिस्किट, कुकीज, केक, शंकरपाळी, नानकटाई, मिल्टिंग मोमेंट, बिवड्या, सिरप/काकवी, गूळ, अल्कोहोल_

रब्बी ज्वारी

 *_रब्बी ज्वारी_* *_बळीराजा_* *_✨आरोग्यदायी ज्वारी_* _◆ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, हृदयरोग्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते._ _◆भूक वाढते, ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी केला जातो._ _◆पचनसंस्थेतील वायुदोष कमी होतात, अॅसिडीटी कमी होते._ _◆आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण कमी करणे शक्‍य_ *_✨प्रति १०० ग्रॅम ज्वारीतील महत्त्वाचे घटक_* _●ज्वारीच्या दाण्यात ओलावा (आर्द्रता) ८ ते १० टक्के, प्रथिने ९.४ ते १०.४ टक्के, तंतूमय घटक १.२ ते १.६ टक्के_ _●खनिज द्रव्ये १.० ते १.६ टक्के,_ _●उष्मांक ३४९ किलो कॅलरीज_ _●कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम,_ _●किरोटीन (प्रो-व्हिटॅमीन ए) ४७,_ _●थायमीन ३७ मिलिग्रॅम_ _लायसीन, मिथीलोअमाईन ही आवश्‍यक अमिनो आम्ल मर्यादित प्रमाणात आढळतात._ *_✨ज्वारीचे पदार्थ -_* _हुरडा, रवा, लाह्या, पोहे, घुगऱ्या, दशमी, थालीपीठ, उत्तप्पा, डोसा, इडली, कुरडई, चकली, आप्पे, चिवडा, खाकरा, अंकित, भातवड्या, पापड, आंबील, मसाल्याचे वडे, बिस्किट, कुकीज, केक, शंकरपाळी, नानकटाई, मिल्टिंग मोमेंट, बिवड्या, सिरप/काकवी, गूळ, अल्कोहोल_

संत्रा पिकावरील काळीमाशी व तिचे व्यवस्थापन

 *_संत्रा पिकावरील काळीमाशी व तिचे व्यवस्थापन_* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* _शेतकरी बंधूंनो संत्रा पिकावरील काळी माशी ही महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर फार मोठ्या प्रमाणात होतो. सर्वप्रथम या किडीची किडीची ओळख करून घेऊ._ *_A) संत्रावरील काळी माशी व तिची ओळख :_* _संत्रा पिकावरील काळी माशी आकाराने लहान साधारणत एक ते दीड मिलिमीटर लांब असून पंख काळसर व पोटाचा भाग लाल असतो. विदर्भातल्या हवामानात या किडीच्या ३ पिढ्या पूर्ण होतात होतात. या कीडीच्या माशा नवतीच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालतात. कोवळ्या पानावर पानावर घातलेली अंडी सूक्ष्म असून सुरुवातीस पिवळसर रंगाची असतात. ४ ते ५ दिवसानंतर या अंड्यांचा रंग करडा होतो. उन्हाळ्यात १५ ते २० दिवसात तर हिवाळ्यात २५ ते ३० दिवसात अंड्यातून माशीची पिले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले सूक्ष्म आकाराची चापट, फिकट पिवळसर रंगाची असतात त्यामुळे ती लक्षात येत नाहीत. ही पिल्ले पानावर फिरून फिरून योग्य जागेचा शोध घेतात नंतर एकाच ठिकाणी राहून पानातील रस शोषण करतात अन्नरस शोषण करतात. काही...

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शेतीविषयक धोरण

 *_छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शेतीविषयक धोरण..._* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* _"शेतकरी सुखी,रयत सुखी तर राजा सुखी" हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते.स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. आज ह्या महापुरूषाची जयंती संबंध मराठी मुलुखात उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कृषी धोरणाचे घेतलेले दर्शन_ _◆छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते.शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते. महाराज जमतेम ५० वर्षे जगले.त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व तर निर्माण केले होतेच शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता._ _◆भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो.सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात.त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत,हे आमचे दुर्दैव. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एक...

बोअर खोदणाऱ्या शेतकऱ्यांनो सावधान

 *_बोअर खोदणाऱ्या शेतकऱ्यांनो सावधान_*  _प्रथम सावकाश वाचा_ _राम राम शेतकरी बंधूंनो,_ *_बोरवाले_* _एजंट शेतकऱ्याला कसे फसवतात ते पहा._ _आपण बोर वाल्याकडे जातो व विचारतो बोर काय फुट घेता तो आपल्याला सांगतो ५७ रुपये फूट व किसिंग २०० रुपये फूट पण आपण त्याला विचारत नाही की सहा इंचीचा किती व ९ इंचीचा किती पण सहा इंचीचा भाव तो सांगतो ५७ रुपये आणि किसिंगचा भाव सांगतो दोनशे रुपये आता दोनशे रुपयाची फोड आशी आहे की पीव्हीसी पाईपचा भाव आहे. ७०/९० रुपये फूट आता २०० मधून ८० रुपये गेले तर खाली राहिले १२० रुपये १२० रुपये फूट नऊ इंची बोर खोदण्याचे असतात._ *_उदाहरण :_* _आपण बोर घेतला दोनशे पन्नास फूट त्याला किसिंग लागला साठ फूट आपण हिशोब करायला जातो त्यावेळेस आपल्याला हिशोब दिला जातो २५० फुटाचे ५७ रुपये व किसिंग साठ फूट दोनशे रुपये प्रमाणे हिशोब केला जातो. आता मला सांगा आपण बोर घेतला दोनशे पन्नास फूट आणि आपण पैसे दिले ३१० फुटाचे म्हणजे आपण पैसे द्यायला पाहिजे होते १९० फुटाचे ५७ रुपये आणि साठ फुटाचे दोनशे रुपये म्हणजे आपल्याला फसवले गेले ६० फूट ५७ रुपये ३४२० रुपये म्हणजे किसिंगच्या साठ फुटी खोदा...

नत्र (नायट्रोजन)चे कार्य

 💈 *नत्र (नायट्रोजन)चे कार्य* 💈 - नत्र हे पिकातील हरितलवकचा घटक आहे.  - नत्र हे जीवानाच्या मुलभुत अशा डी.एन.ए. आणि आर.एन.ए. चा मुलभुत घटक आहे.  - प्रथिनांचा मुलभुत घटक  @kisan यामुळे ज्यावेळेस भरपुर शाकिय वाढ, भरपुर उत्पादन (कडध्यान्ये, तेलबिया) मिळत असते त्यावेळेस भरपुर प्रमाणात नत्राचे शोषण पिकाकडुन झालेले असते. मात्र अति प्रमाणातील नत्राच्या शोषणाने उत्पादनाचा कार्बन-नायट्रोजन गुणोत्तर बिघडुन इतर काही तोटे देखिल होतात. *नत्राचा -हास -* सन १९८० साली अग्रीको केमिकल कंपनीच्या शेती तज्ञांनी पिकास दिलेल्या नत्राच्या विविध स्वरुपांचा अभ्यास केला, तसेच इतर माहीती जमा करुन, त्यांनी खालिल प्रमाणे काही ठोकताळे मांडलेत. जरी हि माहीती १०० टक्के परिपुर्ण आणि सर्व समावेशक नसली तरी यातुन हे मात्र नक्कि होते कि, पिकास दिलेला नत्र ज्या विविध प्रकारे वाया जातो त्याबाबत काही मार्गदर्शक माहीती मिळेल. *पिकाकडुन शोषीत झालेला नत्र 40 % - 70% -* *नत्र वाया जाण्याचे मार्ग -- नत्राचे स्वरुप -- टक्केवारी*  स्थिरीकरण (इंमोबीलायझेशन) -- अमोनिकल, नायट्रेट -- 10-40% झिज (इरोजन) -- अमोनिक...

🌶️मिरची लागवडी जागतिक माहिती 🌶️

  * _🌶️मिरची लागवडी शाखा माहिती 🌶️_ * * _🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_ * * ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ * * _हवामान_ * _ ◆ उष्णह आणि दमट वायुमानाता मिरची पिकाची जीवनाची उत्कर्ष.  मिरची पिकाची लागवड वातावरण, उष्णपाला आणि हिवाळा किंवा तीनही हंगामात घालणे.  पर्यटक जास्ता पाऊस आणि ढगळ नाही.  घ्या आणि फळे कुज.  मिरचीला 40 इंचा आकार कमी पाऊस पडला आहे 25 मिनिटे 30 सेल्सिअस तापमानाला आवडते.  आणि उत्पादनही रहा.  तपमान तफावतीकरण फुले फुले फुले होते.  व उत्खननाचा स्तर.  बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास आवडते ._ * _जमीन_ * _ ◆ पाणिचा उत्स्फूर्त निचरा हाना-या ते मध्याम भारी उगवण मिरचीचे पिक्चर रहा.  हलक्या वाढीच्या पात्रतेच्या केंद्रावरील उत्पादन मिरचीचे पिक्चरल राहण्याची योग्यता निचरा हन्ना-या वाढीव मिर्चीचे पिक्चर घेणारी.  पर्यटक आणि बागायती मिरचीसाठी माता काळी आणि पाणिचा प्रश्न निचरा होला जमिन निवडवी.  मध्य प्रदेश ते अतिवृद्ध मिरची लागवड वर्ग.  निवडखडी ग्रोथही मिरचीचे पिक्चर हो ._ * _हंगाम_ * _ ◆ खरी पिकाची लागवड जून, जूलै महिन्यांत...

योग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर

🌻 योग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर 1) पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात.  2) विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात.  3) विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. 4) विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते. ही खते पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणारी असतात.  5)विद्राव्य खते ही घनरुपाप्रमाणे द्रव्ररूपातसुद्धा उपलब्ध आहेत. 6) पिकांना ठिबक संचाद्वारे विद्राव्य खतांचे द्रावण पाण्याबरोबर दिले जाते. या पद्धतीत पिकांच्या मुळांशी गरजेप्रमाणे रोज किंवा दिवसाआड खते दिली जातात. 7) विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे, सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात. 8) भाजीपाल्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात. 9) अन्नद्रव्याच्य...

बटाटा रोग व कीड

 *🥔बटाटा रोग व कीड :-* *🥔रोग :-* *१)करपा :-* पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात. *👉🏻उपाय :-* डायथेनएम ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. *२)मर :-* मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्याभागावर बुरशीची वाढ झालेली दिसते. पिकांची फरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात अंत येतो. जमिनीत नँप्थलीन किंवा फॉरमँलिन(१:५०) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते. *३)चारकोल राँट किंवा खोक्या रोग :-* या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षाअधिक असल्यास ते रोगजतूना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नसतात. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस च्या वर चढण्यापूर्वी बटाट्याचीकाढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे. *🥔🐛कीड :-* *१)देठ कुडतरणारी अळी :–* राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात. *👉🏻उपाय :-* या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी *२)मावा व तुडतुडे :-* या किडीत पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पान...

🐄 गाईच्या दूध खरेदी दरात वाढ; राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघाचा निर्णय*

 *🐄 गाईच्या दूध खरेदी दरात वाढ; राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघाचा निर्णय* *🌱 कृषी मार्केट, महाराष्ट्र राज्य*  *🎯 राज्यातील* सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 29 रुपये दूध दर देण्याचा निर्णय राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शनिवारी (ता.9) एकमताने घेण्यात आला.  *💁‍♂️ या नव्या* निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून (ता.15) केली जाणार आहे. यामुळे सध्या 29 रुपयांपेक्षा कमी दूध दर असलेल्या दूध संघाचे खरेदी दर वाढणार आहेत.  *👉 खरेदीदरात* वाढ होणार असली तरी *विक्री दरात वाढ केली जाणार नसल्याचे* या संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. *📍दूध संघाच्या* सदस्यांची शनिवारी पुण्यात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (कात्रज डेअरी) बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राज्यभरातील (सहकारी व खासगी मिळून) सुमारे 40 दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  *👉लॉकडाऊनमुळे* मागील सुमारे वर्षभरापासून या संघाची एकही बैठक घेता आली नव्हती. त्यामुळे सुमारे वर्षभराच्या खंडानंतर आज ही ...

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

 *_🍃कढीपत्ता लागवडीबाबत माहिती 🍃_* _कढीपत्याचे शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोइनिगी’ आहे ही अत्यंत काटक, बहुवर्षांयु, ८ ते १० फुटांपर्यंत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीला ‘गोड निंब’ म्हणूनही ओळखले जाते. याची पाने देठाला समोरासमोर येतात. त्यांना विशिष्ट सुवास असतो. हिवाळ्यात पानगळ होते. सर्व प्रकारच्या हवामानात ही वनस्पती सहज जगू शकते. या पिकाची व्यावसायिक पध्दतीने लागवड केल्यास व शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास हे पीक फायदेशीर होऊ शकते._ *_📌जमीन, हवामान :_* _हलक्‍या, वाळूमिश्रित जमिनीपासून ते लाल, काळ्या, कसदार जमिनीत लागवड शक्य. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये. मुरमाड, खडकाळ जमिनीतही बऱ्यापैकी वाढतो. समशीतोष्ण ते उष्ण हवामान पोषक. ऊन मात्र व्यवस्थित लागायला हवे. २६ ते ३७ अंश से. तापमानात उत्तम वाढ._ *_💥जाती :_* _मोठ्या पानांचा/लहान पानांचा कढीपत्ता_ _सेन कांपा व डीडब्ल्यूडी-१, डीडब्ल्यू-२, या धारवाड येथील कृषी महाविद्यालयाने अधिक स्वादाच्या जाती विकसित केल्या आहेत. मोठय़ा पानांच्या कढीपत्त्याला सुगंध तुलनेने कमी. त्यातील स्वादयुक्त तेलाचे (इसेन्शिअल ऑईल) प्रमाण ४ ते ५ टक...

पीक उत्पादन वाढवायचे? तर मग मधमाश्‍यांची घेऊ काळजी!*🐝

 *🐝पीक उत्पादन वाढवायचे? तर मग मधमाश्‍यांची घेऊ काळजी!*🐝 कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करणाऱ्या सजीवांचे संरक्षण, मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही गोष्टींचे काटेकोर व्यवस्थापन करणेही गरजेचे राहील.  डॉ. मिलिंद जोशी मधमाश्‍यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच आज आपण पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो. एकूण पिकांपैकी पाच टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते. तर 85 टक्के पिकांत परपरागीभवन दिसून येते.  मेक ग्रेगोर नामक प्रसिद्ध परागीभवनतज्ज्ञाच्या मते मनुष्याच्या आहारातील एक-तृतीयांश भाग सरळ किंवा अनपेक्षितपणे मधमाशी व अन्य कीटकांद्वारे परागीभवन झालेल्या पिकांद्वारे मिळतो. जगात मधमाशी व अन्य कीटकांद्वारे होणाऱ्या परागीभवनाचे आर्थिक मूल्य वार्षिक 60 ते 70 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. आपल्या देशातही सुमारे सात टक्के पिकांमध्ये कीटकांद्वारे परागीभवन होते. आपला कृषी विकासदर वाढविणे गरजेचे असल्याने परागीभवन करणाऱ्या सजीवांचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही.  मधमाश्‍यां...

बटाटा पीक व्यवस्थापन

 *बटाटा पीक व्यवस्थापन* बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. हवामान बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते. जमीन मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा. पूर्वमशागत जमीन नांगरानी २० ते २५ सेंमी नांगरावी. १ महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी. पुन्हा १ आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, जमिनीत हेक्टरी ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत प...