_डाळिंब_
*_डाळिंब_* *_बळीराजा_* _बुरशीजन्य मर रोगाचे व्यवस्थापन - फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा बहराच्या सुरुवातीच्या टप्प्यात ड्रेचिंगला प्राधान्य द्या. खालीलपैकी फक्त एक पद्धत वापरा._ *_👉पहिली पद्धत -_* _प्रोपिकोनॅझोल (२५ इसी) २ मि.लि. अधिक क्लोरपायरिफॉस (२० इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे १० लिटर द्रावण प्रति झाड ड्रेचिंग करावी. पहिल्या ड्रेचिंगच्या ३० दिवसांनंतर, अॅस्परजिलस नायजर ए.एन. २७ बुरशी ५ ग्रॅम प्रति झाड आणि २ किलो शेणखत प्रति झाड द्यावे. त्यानंतर ३० दिवसांनी, व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा - राइझोफॅगस इररेगुलरिस) २५ ग्रॅम आणि २ किलो शेणखत प्रति झाड द्यावे._ *_👉दुसरी पद्धत -_* _प्रोपिकोनॅझोल (२५ इसी) २ मि.लि. अधिक क्लोरपायरिफॉस (२० इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे प्रति झाड १० लिटर द्रावणाचे वीस दिवसांच्या अंतराने तीनवेळा ड्रेचिंग करावे._ *_👉तिसरी पद्धत -_* _पहिले व तिसरे ड्रेंचिंग, फोसेटिल ए.एल. (८० डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रति झाड आणि दुसरी व चौथी ड्रेंचिंग, टेब्यूकोनॅझोल (२५.९ w/w ईसी) ३ मि.लि. प्रति झाड प्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून करावे. दोन ड...